पूर्णेतील इंडियन लाॅजवर आढळला ४८ वर्षीय ईसमाचा मृतदेह;हत्या की आत्महत्या चर्चेला उधाण

Spread the love
पूर्णा ता.१७(प्रतिनिधी) 
शहरातील रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या इंडियन लाॅज मधील खोलीत एका ४८ वर्षीय ईसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना (ता.१७) रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली असून,घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदरील प्रकरणात हत्या की..? आत्महत्या..! अशी जोरदार चर्चा सुरू आहे.
आनंद वासुदेवराव विष्णुपूरीकर (वय ४८) व्यवसाय नौकरी.रा.विष्णुपरी,नांदेड असं मयत ईसमाचे नांव आहे.पूर्णा शहरातील रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या इंडियन लाॅजच्या रेकॉर्ड बुक मध्ये त्यांचे नावं ,तो थांबला असलेल्या तुमचा क्रमांक १०२ तसेच तो (ता.१६) रोजी सायं ६;३० वाजण्याच्या सुमारास नांदेड येथून आल्याची नोंद आढळली आहे.हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार तो लाॅजवर आल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी चेक आऊट वेळे पर्यंत आपल्या रुमचा दरवाजा उघडला नसल्याने लाॅजचे मॅनेजर यांनी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास त्यांचा दरवाजा वाजवला.अनेक वेळा दरवाजा वाजवून ही दरवाजा उघडला जात नसल्याने, मॅनजरने शेवटी दरवाजा तोडला.त्यावेळी उपस्थितांना रुम मध्ये तो ईसम पंलंगावरुन खाली पडलेल्या अवस्थेत दिसून आला.घटनेची माहिती लाॅज मालकाने पूर्णा पोलिसांना कळविली पो.नि.विलास गोबाडे,फौजदार प्रकाश इंगोले,पोहेकाॅ.प्रल्हाद घोळवे पोकाॅ. दत्ता कुंभारगावे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेत पाहाणी केली.लाॅजच्या रेकॉर्ड बुक नोंद व आधारकार्ड यावरुन मयताचे नातेवाईकांना संपर्क साधला असुन पोलीसांनी उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे.दरम्यान इंडियन लाॅजवर मयत अवस्थेत आढळलेल्या ईसमाच्या मृत्युचे कारण अद्याप तरी अस्पष्ट आहे. मात्र शहरात घटनेप्रकरणी उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.त्याची हत्या झाली का त्याने आत्महत्या केली अशी जोरदार चर्चा शहर परिसरात रंगली आहे.घटनेचा तपास पो.नि.विलास गोबाडे हे करत आहेत.

You cannot copy content of this page