पूर्णेच्या ITI मध्ये कारगिल विजय दिनाचे निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
पूर्णा, ता.२३(प्रतिनिधी)
येथील पांगरा रोड परिसरात कृषीभूषण स्व.ॲड.गंगाधर उर्फ दादा पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कारगिल विजय दिनानिमित्त शनिवारी (ता.२६) सकाळी ११:३० वाजता विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.१९९९ च्या कारगिल युद्धामध्ये भारतीय सैनिकांनी उत्कृष्ट पराक्रम करून विजय मिळविला आहे. कारगिल विजय दिवस शौर्य बलिदान व स्वराज्याचा उत्सव दिन म्हणून साजरा केला जातो . या निमित्य आबनराव पारवे यांच्या व्याख्यानाचे तसेच माजी सैनिकांच्या अनुभव कथनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी माजी सैनिक, वीर माता, वीर पत्नी यांचा सन्मान करण्यात येणार आहे. शहिद सैनिकांना अभिवादन करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्राचार्य पांडुरंग अन्नपूर्णे यांनी केले आहे.