एसबीआय बँकेकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

Spread the love

पूर्णा(प्रतिनिधी)

लिमला येथील जय किसान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्टेट बँक ऑफ इंडिया एस. सी/ एस.टी./बी.सी. एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र सर्कल परभणी रिजन द्वारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या१३४ व्या जयंतीच्या निमित्ताने५००विद्यार्थ्यांसाठी बॅग व वॉटर बॉटल या शैक्षणिक साहित्याचे वाटप शनिवार (ता.१९) रोजी करण्यात आले. 

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष दुर्गादास जोशी तर प्रमुख अतिथी म्हणून रिजनल मॅनेजर सम्राट पूरकायस्थ , सदाशिव चाळणेवाड, श्रीमती शिल्पा जिंतुरकर, किरणकुमार जिंतूरकर, रंजीत काकडे , संदीप जोगदंड, विनीत पाटील, कार्यवाहक विष्णूनाना जोगदंड, प्राचार्यअनंत काळे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य अनंत काळे, तर सूत्रसंचालन हनुमंत हंबीरे , आभार विजय कदम यांनी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेश विठ्ठल, कृष्णा वाडीकर, योगेश गुंडाळे, नंदकिशोर जांबुतकर यांनी पुढाकार घेतला.

You cannot copy content of this page