Local Electionsपुर्णा शहरातील प्रभाग रचना अधिसूचना प्रसिद्ध .!

Spread the love

पुर्णा ता.१८(प्रतिनिधी)

(Local Government Elections) : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी संदर्भात न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार निवडणुकीची प्रक्रिया गतिमान झाली आहे. त्या निमित्ताने आज सोमवारी ता.१८ रोजी सकाळी १०:३० वा.पुर्णा शहरातील (The Published Of Draft Ward Boundarys)प्रभागांच्या भौगोलिक सीमा (प्रभाग रचना )प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती पालीकेचे मुख्याधिकारी उत्कर्ष गुठ्ठे यांनी दिली आहे.

जवळपास ५ वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नव्हत्या. परंतु, न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी लगबग सुरू झाली आहे. त्या निमित्ताने पुर्णा नगरपरिषदेच्या सन २०२५-२०२६ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागाच्या भौगोलिक सीमा प्रसिद्ध करण्यासाठी आज सोमवारी रोजी अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर १८ ते ३१ऑगस्ट दरम्यान दुपारी ३ वाजेपर्यंत यावर हरकती व सूचना हिंगोली नगरपरिषद (Purna Municipal Council) मुख्याधिकाऱ्याकडे स्वीकारल्या जाणार आहेत. हरकती व सूचना दाखल करणाऱ्या नागरिकांना सुनावणीसाठी उपस्थित राहण्याची माहिती स्वतंत्रपणे कळविली जाणार असल्याची माहिती पुर्णा नगर परिषदेच्या वतीने देण्यात आली आहे

You cannot copy content of this page