महावितरणचा लपंडाव: पूर्णा शहरात नागरिक त्रस्त,वरिष्ठांकडून उत्तरदायित्व टाळले जातेय..?

Spread the love

महावितरणच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह;ग्राहक वैतागले

पूर्णा ता.२८(प्रतिनिधी) Purna Mahavitaran News ऐन सणासुदीच्या काळात देखील पुर्णेकरांना विजेच्या लंपडवापासुन सुटका मिळत नाहीय.गणेशोत्सवाच्या धामधुमीत अधुन मधुन विज पुरवठा खंडित होत आहे.स्थानिक महावितरण प्रशासन यावर तोडगा काढण्या ऐवजी तुघलकी कारभार करत असल्याचे चित्र आहे.वरिष्ठांकडूनही उत्तरदायित्व टाळले जातेय यामुळे ग्राहक अक्षरशः वैतागले आहेत.

     पुर्णा शहर व परिसरात मागील काही महिन्यांपासून महावितरण कंपनीच्या तुघलकी कारभाराने कळस गाठला आहे. दिवसरात्र कधीही विद्युत पुरवठा तास- नतास खंडित होणे असे प्रकार घडत आहेत.सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे.गणरायाचे आगमन सोहळ्याचे स्वागत देखील स्थानिक महावितरण कंपनीच्या वतीने विज पुरवठा बंद ठेऊन केले.बुधवारी (ता.२७) रोजी सकाळी सहा ते रात्री १२ वाजेपर्यंत ५ ते ६ वेळा कधी अर्धा तर कधी पाऊण तास अश्या पद्धतीने विद्युत पुरवठा खंडित झाला होता.तशी शहरातील आनंदनगर फिडरवरी वाटसप ग्रुप मध्ये नोंद आहे. शहर व परिसरात वारंवार तार तुटण्याची शृंखला देखील सुरुच आहे. साधा फ्युज जरी गेला तरी विज पुरवठा अर्ध्याहुन अधीक काळ विज खंडित होत आहे. दरम्यान ग्राहक सेवा केंद्राचा संपर्क मोबाईल देखील बंद ठेवला जात आहे.येथे काम करणारे अभियंता कर्मचारी अनेक जणं नांदेड परभणी येथून कारभार हाकत आहेत.अत्यावशक सेवेचा या कर्मचाऱ्यांनी बोजवारा उडवून दिला आहे.

        महावितरणच्या वतीने वीज बील वसुली करण्यासाठी पथक तैनात करण्यात आली आहेत.वसुली जोमात परंतु विद्युत पुरवठा कोमात अशी गत शहरात झाली आहे.सण उस्तव असो किंवा काहीही असो विज गुल झाल्यास तास दोन तास तर कधी पाच ते सहा तास गुल होत असते.याकडे स्थानिक अधिकारी कर्मचारी तर सोडाच परंतु परभणी नांदेड येथिल वरीष्ठ देखील दाद देत नसल्याने ग्राहकांची कुचंबणा होत आहे.

        स्थानिक महावितरण प्रशासनाला याबाबत विचारले असता त्यांनी सांगितल्या नुसार येथे पुरेसे कर्मचारी नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. गणेश उस्तव काळ सुरू आहे.कर्मचारी संख्या वाढवून मिळाल्यास काही अंशी दिलासा मिळुन शकतो असे सांगितले जाते आहे.

     नांदेड विभागाचे  येथील मुख्य अभियंता (CE),परभणी येथिल अधीक्षक अभियंता (SE),कार्यकारी अभियंता(EE),यांनी पुर्णा शहरात विजबील वसूली सोबतच  ग्राहकांना अखंडपणे सेवा मिळावी यासाठी लक्ष द्यावे.येथिल कर्मचाऱ्यांची वाणवा, विस्कळित झालेले प्रशासन यांची घडी बसविणे हे देखील ग्राहकांचे हित जपण्यासाठी महत्वाचे आहे.आता त्यांच्या भुमिकेकडे लक्ष लागले आहे.

You cannot copy content of this page