पालीकेकडून अतिक्रमण विरोधी मोहीमेचा”फुसका बार”..?
एक टपरी जप्त करत अर्ध्या तासातच मोहीम गुंडाळली;पालीकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांची मोहीमेकडे पाठ
पूर्णा(प्रतिनिधी)
येथील पूर्णा पालीकेने मोठा गाजावाजा करुन शहरातील अतिक्रमण मोडीत काढण्यासाठी आखलेली मोहीम पालीकेला अर्ध्या तासातच आटोपती घ्यावी लागल्याची नामुष्की पालीकेवर ओढवली आहे.हाती घेतलेल्या मोहीमेत पालीकेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी पाढ फिरवल्याने अतिक्रमण विरोधी पथकाने रेल्वे स्थानक रस्त्यावरील केवळ एकमेव टपरी जप्त करून काही वेळातच काढता पाय घेतला.यामुळे पालीकेची ही मोहीम फुसका बार ठरल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
पूर्णा नगरपालिकेने शहरातील वाढलेले अतिक्रमण काढण्यासाठी पालिकेकडून मागील दोन दिवसांपासून शहरांमध्ये जागोजागी दोन्ही क्षेपणाद्वारे अतिक्रमण धारकांना सूचनाही दिल्या गेल्या होत्या.प्रत्यक्षात मंगळवार ता. २६ मे रोजी अतिक्रमण मोहीमही हाती घेतली होती. परंतु पालिकेच्या या अतिक्रमण मोहिमेचा पुरता फज्ज्या उडाल्याचे चित्र पहावयास मिळाले. अतिक्रमण काढण्यासाठी पालिकेचे सफाई विभागातील क्षत्रिय अधिकारी तसेच काही कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते.रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्यावर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.परंतु या मोहिमेकडे पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांसह कार्यालयीन अधीक्षक, नगर, पाणीपुरवठा स्वच्छता, विद्युत अभियंते यांनी मात्र पाठ फिरवल्याचे दिसून आले.
दरम्यान रेल्वे स्थानक ते चर्च रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणधारकांनी बस्तान बसवले होते. पालिकेने केलेल्या आवाहनानंतर काही अतिक्रमणधारकांनी आपापले टपऱ्या पत्रे आधी साहित्य उचलून नेले तर बहुतेक अतिक्रमण धारकांनी पालीकेच्या आवहानास प्रतिसाद दिला नाही.शेवटी पालखीच्या अतिक्रमण विरोधी पथकाने रेल्वे स्थानक परिसरातील केवळ एकमेव टाकील टपरी उचलत ही होईल केवळ अर्ध्या तासातच आटोपती घेतली.शहरातील आनंद नगर आदर्श कॉलनी अली नगर बस स्थानक बोर्डीकर प्लॉटिंग परिसरात जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना तसेच महिलांना या रस्त्याने जाणे फार जिकरचे झाले होते त्यामुळे अनेकांनी याबाबत पालिकेकडे तक्रारीही केल्या होत्या. यानंतर पालिकेकडून अतिक्रमण साफ करून रस्ता मोकळ्या करण्यास मुहूर्त मिळाला होता परंतु तो यशस्वी झाल्याने शहरात पालिकेने अतिक्रमण मोहिमेचा फुसका बार वाजवला असल्याची चर्चा ऐकावयास मिळाली. बारगळलेली ही मोहीम पालिका पुन्हा हाती घेणार का शहरातील वाढलेली अतिक्रमण जमीन दोस्त करणार का.? कि ‘मी रडतो, तु हाण’ या म्हणी प्रमाणे सोंग करणार, याकडे आता पूर्णा शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
पोलिस बंदोबस्त मिळताच मोहीम सुरू करणार -मुख्याधीकारी गुट्टे
पालिकेच्या मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पालिकेने शहरातील अतिक्रमण मोडीत काढण्यासाठी अतिक्रमण विरोधी मोहीम मंगळवारी आखली होती.परंतु मोहीम यशस्वी पार पाडण्यासाठी पोलीस फोर्स मिळाला नाही.त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये पोलीस फोर्स मिळाल्यानंतर शहरातील वाढलेले अतिक्रमण पूर्णतः साफ करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.