पूर्नसर्वेक्षण करून कर निर्धारण करावे-बसपा नेते देवराव खंदारे
पूर्णा(प्रतिनिधी)
पालीका अंतर्गत हद्दीत कोअर प्रोजेक्ट प्र.लि.अमरावती कंपनीने शासनाने घालून दिलेले निर्देश बाजुला सारुन शहरातील मालमत्तेचे सर्वे करून करनिर्धारण केले आहेत.त्यामुळे पालीकेने नियमानुसार पूर्नसर्वेक्षण करून कर निर्धारण करावे अशी मागणीचे निवेदन बसपा नेते देवराव खंदारे यांनी पालीकेला दिले आहे.
पूर्णा शहरात पालीकेने नागरिकांसमोर मालमत्ता कराची दरवाढ केली आहे.त्यामुळे सर्वच स्तरातून यास मोठा विरोध होताना दिसत आहे.बसपाच्या वतीने शुक्रवारी २३ मे रोजी पालीकेला वाढीव मालमत्ता कराबाबत देवराव खंदारे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.निवेदनात पुढे असं म्हटलं आहे की,कर निर्धारीत करताना शासनाने घालून दिलेले निर्देश हे बाजूला सारून कर निर्धारीत करण्यात आल्याचे दिसून येते, तसेच एखादयाची मालम्मत्ता दूसऱ्याच व्यक्तीच्य नावे दाखवून कर वसुलीची मागणी नोटीस देण्यात आल्या तर काही ठिकाणी शासनाने घालून दिलेले गटानूसार कर निर्धारीत करण्यात आले असून त्या गटाचे कर निर्धारीकरण दिसत नाही. उदा. डॉ. आंबेडकर नगर सिध्दार्थ हा भाग झोपडपटटी गायराण क्षेत्र आहे परंतु बऱ्याच ठिकाणी झोपडपटटी नसार जो गट निर्धारीत रण्यात आला आहे तो बाजूला सारून त्यास अतिरीक्त गट दाखवून त्यांना अवाजवी असे कर निर्धारण करून वसूलीच्या नोटीस देण्यात आल्या आहेत. अश्या एक नाहीतर अनेक चूका या सर्वेक्षणात झाल्या आहेत.त्यामुळे पूर्नसर्वेक्षण करून कर निर्धारण करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.निवेदनावर बसपा नेते देवराव खंदारे यांच्या सह युवराज सुर्यतळ,धारणा गायकवाड,भिमराव जोंधळे,चंद्रकांत कांबळे, प्रकाश खरे, हरिशचंद्र मकासरे,कृष्णा धुमाळे,शे.सलीम शे.मस्तान यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.