रेल्वे लोहमार्गावर आढळलेल्या त्या दोन बेवारस मृतदेहाची ओळख पटेना

Spread the love

पुर्णा पोलीसांकडून शोध पत्रीका जारी;माहीती देण्याचे केले आवहान

पूर्णा (ता.३०) प्रतिनिधी; पूर्णा ते नांदेड दरम्यान रेल्वे मार्गावर दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अज्ञात पुरुषांचे मृतदेह आढळले होते.अद्यापपर्यंत मयत ईसमांची ओळख पटवली नसल्याने पुर्णा पोलिसांनी अखेर शोध पत्रीका जारी करत संबंधित ईसमाबाबत माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

पुर्णा ते नांदेड रेल्वे मार्गावर १० एप्रिल २०२५ रोजी घडली. राज्यराणी एक्सप्रेसच्या लोको पायलटने पूर्णा रेल्वे स्टेशनला माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोल क्र. ३२१/३ जवळ अंदाजे ३० वर्षांचा पुरुष रेल्वे अपघातात मृत अवस्थेत आढळला. त्याचे वर्णन असे – उंची साधारण १६५ से.मी., रंगाने सावळा, अंगावर काळसर रंगाचा फुलबाह्यांचा शर्ट व पाडन्या रंगाची पॅन्ट, डोळे मोठे, चेहरा गोल व केस अर्धवट. मृतदेहाची ओळख पटली नसल्याने त्याचा अंत्यविधी हिंदू स्मशानभूमी पूर्णा येथे करण्यात आला.

दरम्यान दुसरी घटना २ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५.१५ वाजता नांदेड–पूर्णा रेल्वे मार्गावर घडली. ट्रेन क्रमांक १७६६१ ने धडक दिल्याने अंदाजे ४५ वर्षांचा पुरुष मृत झाला. त्याचे वर्णन – उंची साधारण १६५ से.मी., अंगाने जाड, रंगाने गोरा. या मृतदेहाचीही ओळख पटली नसल्याने त्याचा अंत्यविधी पूर्णा येथील हिंदू स्मशानभूमीत करण्यात आला.

या दोन्ही घटनांतील मृत व्यक्तींची ओळख पटलेली नसल्यामुळे जर कोणाला त्याबाबत माहिती असल्यास त्यांनी पूर्णा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक विलास गोबाडे (मो.९८३४५३०४६१) किंवा तपासी अधिकारी सपोनि गजानन पाटील (मो.८८०५९५७४००) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page