शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या-पुर्णा राष्ट्रवादी काँग्रेसचे मदत व पुनर्वसन मंत्र्यांना निवेदन..

Spread the love

पुर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदआबा पाटील, यांचा अतीवृष्टीने बाधीत भागाचा पहाणी दौरा;आ.राजेश दादा विटेकर,आ. रत्नाकर गुट्टे व मा.आ. विजय भांबळे यांची उपस्थिती;तालुका अध्यक्ष शहजीराव देसाई यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिले निवेदन

पूर्णा ता.२५ (प्रतिनिधी)
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदआबा पाटील, यांनी गुरुवारी (ता.२५) रोजी तालुक्यातील मौजे धानोरा काळे येथे अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या भागाची पाहणी केली.पुर परिस्थीतीचा आढावा घेतला.यावेळी पुर्णा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुका अध्यक्ष शहजीराव देसाई यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी निवेदन देत.पुर्णा तालुक्यातील सरसकट शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी केली.

परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टर जमीन बाधीत झाली असून,खरीप हंगाम पुर्णतः वाया गेला आहे. तालुक्यातील नुकसान व पुर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदआबा पाटील, हे गुरुवारी (ता.२५) रोजी जिल्हा दौऱ्यावर होते.त्यांनी पुर्णा तालुक्यात धानोरा काळे गावाला भेट दिली.यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा आ.राजेश दादा विटेकर, आ. रत्नाकर गुट्टे आणि मा. आ. विजय भांबळे यांची उपस्थिती होती.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुर्णा तालुकाध्यक्ष शहाजीराव देसाई, यांच्या नेतृत्वाखाली पुर्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्रीधरराव पारवे, संचालक गजानन धवन, अंकुशराव शिंदे, पंढरीनाथ कदम मामा, शंकरराव नवघरे, पैलवान शेख मुसेफभाई, डी. यन. किरगे, विठ्ठलराव कदम, आनंदराव जोगदंड, भिमराव डोईफोडे, विजय मोरे आदीं पदाधिकाऱ्यांनी मंत्री महोदयांची भेट घेऊन,पुर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीतील नुकसानीबाबत तालुक्याच्या वतीने निवेदन देण्यात आले.निवेदनात मागील महिन्याभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, पिके, जनावरांचे चारापाणी, घरे व शिवार यावर गंभीर परिणाम झाला आहे. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना तात्काळ शंभर टक्के सरसकट पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली आहे..यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


You cannot copy content of this page