Purna रेल्वे उड्डाणपूला लगतच्या पर्यायी रस्त्याची दुरावस्था;महारेलसह संबंधित प्रशासन झोपेत
कोणीतरी सांगा यांना आम्ही जायचे कसे
पूर्णा ता.२०(प्रतिनिधी) overbridge side road शहराजवळील निर्माणधीन रेल्वे उड्डाणपुलाच्या पर्यायी रस्त्याची अवस्था इतकी दयनीय झाली आहे की, हा मार्ग आता नागरिकांसाठी ‘मृत्यूचा सापळा’ बनला आहे. पूर्णा-नांदेड जोडणारा हा मुख्य पर्यायी रस्ता खोल खड्डे, उघडी गिट्टी आणि पावसाच्या पाण्याने भरलेल्या डबक्यांमुळे वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे.MAIRDC महारेल कार्पोरेशन व संबंधित विभागाविरोधात स्थानिक नागरिकांचा संताप अनावर होत आहे.
पुर्णा शहरातील हिंगोली व नांदेड रेल्वे लोहमार्गावर उड्डाणपूल बांधण्याचे काम मागील ५ वर्षांपासून सुरू आहे.सदरील काम महारेल कार्पोरेन व संबंधित विभाग करत आहे.परभणी-पुर्णा-नांदेड जाण्यासाठी याठिकाणी रेल्वे गेट ओलांडून जावे लागत असे उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू होण्यापूर्वी प्रशासनास भुयारी मार्गाखालुन पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्यात आला.वाहनांची वर्दळ लक्षात घेता रस्ता मजबतीसाठी निधीची तरतूद करण्यात आली परंतु सदरील कामाच्या कंत्राट कंपनीने याकडे दुर्लक्ष केले.मागील काही महिन्यांपासून वापरल्या जाणाऱ्या पर्यायी रस्त्याची अवस्था अक्षरशः भयावह झाली आहे. रस्त्यावर दोन ते तीन फूट खोल खड्डे, साचलेले पाणी, आणि उघडी गिट्टी यामुळे वाहनांचे संतुलन बिघडण्याचा धोका वाढला आहे. उघड्या गिट्टीमुळे वाहनांचे टायर फाटणे, स्लिप होणे आणि सस्पेन्शन खराब होण्याच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत. यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.हा रस्ता पूर्णा शहराला मुख्य मार्गाशी जोडणारा असल्याने दररोज हजारो वाहनचालक, विद्यार्थी, व्यापारी, शेतकरी आणि रुग्णवाहिका यावरून प्रवास करतात. खराब रस्त्यामुळे वाहनांचे नुकसान, वेळेची नासाडी आणि जीवितहानीचा धोका यांचा सामना नागरिकांना रोज करावा लागतो. स्थानिक नागरिक संतप्तपणे म्हणतात, “साहेब, एकदा तरी गाडी घेऊन या रस्त्यावरून जा, मग आमचा रोजचा त्रास समजेल!”

छायाचित्रकार-सुशिल गायकवाड पुर्णा
प्रशासनला जाग येणार तरी कधी..? रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला असताना प्रशासन मात्र गाढ झोपेत आहे.नागरिकांचा जिल्हा प्रशासन आणि महारेल कार्पोरेशन यांच्या विरोधात रोष वाढत आहे. संबंधित विभागांनी तातडीने लक्ष द्यावे, रस्त्याची दुरुस्ती करावी, खड्डे बुजवावेत आणि गिट्टी दाबून रस्ता सपाट करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा जन आंदोलन छेडण्याचा मनस्थितीत स्थानिक संघटना तयार असल्याचे दिसून येत आहे.












