मोबाईलच्या कारणाहुन एकास टांबी व दगडाने गंभीर मारहाण..

Spread the love

मोबाईलच्या कारणाहुन एकास टांबी व दगडाने गंभीर मारहाण..
भांडण सोडवण्यासाठी आलेल्या आईच्या अंगावर ट्रॅक्टर चालवला
पुर्णा/ प्रतिनिधी
पुर्णा तालुक्यातील ममदापूरात मागील तिन महिण्यापासून मोबाईल घेतला या कारणावरून तिघांनी मिळून संगणमत करून एकाच्या डोक्यात लोखंडी टांबी मारून गंभीर जखमी करीत भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या जखमीच्या आईच्या अंगावर ट्रेक्टर क्र.एमएच २२-एक्स ९१२ हे वाहन चालवत घालून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना दि.१६ मार्च २०२१ रोजी सकाळी ११-१५ वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या राहत्या घरासमोर घडली.
या घटने संदर्भात जखमी युवकाचा भाऊ राजकुमार बाबुराव काळबांडे यांनी आज गुरूवार दि.१८ मार्च २०२१ रोजी दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी तुकाराम शिंदे,संतोष शिंदे,विश्वनाथ शिंदे या तिघांच्या विरोधात पुर्णा पोलिस स्थानकात गुरनं.१०७/२०२१ कलम ३०७,३२६,३२३,३३६,३४ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पो.नि.बि.पी.चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.दिनेश मुळे हे करीत आहेत

You cannot copy content of this page