वंचितची गंगाखेड मतदारसंघात ईव्हीएम विरोधात आजपासून स्वाक्षरी मोहीम

Spread the love

गावोगावी जाऊन स्वाक्षरी मोहीम राबवावी-जिल्हाध्यक्ष मगरे

परभणी(प्रतिनिधी)

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांनी ईव्हीएम विरोधात आक्रमक भूमिका घेतली असून,वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक मतदार संघात ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी आंदोलन राबविण्याची घोषणा केली आहे.त्याअनुषंघाने पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज मंगळवार दि.३ डिसेंबर पासून या स्वाक्षरी मोहीमेत सहभागी होऊन गावोगावी जाऊन स्वाक्षरी मोहीम राबवावी असे आवाहन वंचित आघाडीचे परभणी जिल्हाध्यक्ष सुनील मगरे यांनी केले आहे.
राज्यात २०२४ विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत.अनेक मतदार संघात अनपेक्षित निकाल लागले आहेत तर विभागातील आजुबाजूला असलेल्या मतदारसंघात पराभुत व विजयी उमेदवार यांच्या मतांत साम्य असल्याने ईव्हीएमच्या सदोष पद्धतीवर रोष व्यक्त केला जात आहे.महायुती व्यतिरिक्त सर्वच राजकीय पक्षाच्या वतीने ईव्हीएम विरोधात आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला जातो आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी नुकतीच ईव्हीएम विरोधात आपल्या पक्षाच्या राज्यभरातील जिल्हा अध्यक्षांशी आँनलाईन बैठकीच्या माध्यमातून संवाद साधला.यावेळी त्यांनी एक फार्म देखील जिल्हा अध्यक्षांना देऊ केला आहे. हा फार्म घेऊन मतदार संघातील पदाधिका-यांनी गावोगावी, प्रभागात जाऊन किमान १० हजार जणांकडून हा फार्म भरुन दि.१६ रोजी पर्यंत जमा करावा अशी सुचना केली आहे.त्यानुसार परभणी दक्षीणचे जिल्हाध्यक्ष सुनील मगरे यांनी परभणी दक्षिण भागातील सर्व तालुका,शहर कार्यकारणीच्या पदाधिकारी सदस्य व सर्व कार्यकर्त्यांना पाठवले असून,मंगळवार दि.३ डिसेंबर पासून स्वाक्षरी मोहीम हाती घेत सदरील फार्म मतदारांकडून भरुन घेत ही मोहीम यशस्वी करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

You cannot copy content of this page