पूर्णा तालुक्यात कापसाला मिळाला ७ हजार २५१ रुपयांचा भाव
कृ.उ.बा.समीती.ताडकळस अंतर्गत कापूस खरेदीला सुरुवात
पूर्णा(प्रतिनिधी)
तालुक्यात कापूस खरेदीला सुरुवात झाली असून,ताडकळस येथील जे.आर.काॅटन जिनींग येथे दि. ४ डिसेंबर रोज बुधवारी सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ सोहळा पार पडला. यावेळी शुभारंभ शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल ७ हजार २५१ रुपये भाव मिळाला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती ताडकळस ता.पूर्णा अंतर्गत येणाऱ्या पूर्णा रोडवरील जे.आर.काॅटन जिनींग येथे आज बुधवारी शासनाच्या वतीने कापुस खरेदी शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळीमाजी जि.प.सदस्य रामनारायण मुंदडा, रामराव आंबोरे, माणीकराव हजारे, बाजार समितीचे सभापती बालाजी रूद्रवार, उपसभापती अंकुशराव शिंदे, सरपंच गजानन आंबोरे, संचालक रंगनाथ भोसले, कैलास मुंदडा,पत्रकार मदनराव आंबोरे, सुरेश मगरे,धुराजी होनमणे आदीं मान्यवरांची उपस्थिती होती.यावेळी खरेदीसाठी शेतकऱ्यांनी आणलेल्या कापासाची क्रमवारीत ग्रेडींग करण्यात आली.शेतक-यांना ७ हजार २५१ रुपयांचा भाव मिळाला आहे.या वेळीप्रथम कापूस आणलेल्या कळगांव येथील शेतकरी भुजंगराव सुर्यवंशी यांच्या बाजार समिती व जिंनींगच्या वतीने सन्मान करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी बाजार समितीच्या व जीनींग कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.