गुटखा तस्करी करणाऱ्या दोन दुचाकीस्वारांना ४१ हजारांच्या गुटख्यासह पकडले
पूर्णा पोलीसांची तालुक्यातील कात्नेश्वर,देगांव फाटा येथे कारवाई;दोघांसह दुचाक्याही जप्त;गुन्हे दाखल
पूर्णा(प्रतिनिधी)
प्रतिबंधक गुटख्याची विक्री तसेच तस्करी रोखण्या-या पूर्णेतील पोलीस पथकाने दि.४ डिसेंबर रोजी तालुक्यातील कात्नेश्वर शिवारातील नांदगाव रोडवर तसेच झिरोफाटा रस्त्यावरील देगांव फाटा परिसरात रस्त्यावर छापेमारी करत दुचाकीवरुन गुटखा घेऊन जाणाऱ्या दोन गुटखा तस्करांना दुचाकीसह ताब्यात घेऊन जेरबंद केले आहे.याप्रकरणी पूर्णा पोलिस ठाण्यात कलम१२३,२२३,२७४, २७५ भारतीय न्याय संहीता सह कलम ५९ अन्नसुरक्षा व मानके अधिनियम २००६ प्रमाणे विविध दोन गुन्हे दाखल करण्यात आला आहेत.
पूर्णा तालुक्यात राज्य शासनाने प्रतिबंधक केलेल्या गुटख्याची मोठ्या प्रमाणात गुटख्याची विक्री तसेच तस्करी होत आहे.मागील काही दिवसांपासून
पूर्णा उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. समाधान पाटील हे गुटखा तस्करीला आळा घालण्यासाठी अँक्शनमोडवर आले आहेत.पूर्णा हद्दीत पो.नि.विलास गोबाडे यांच्या नेतृत्वाखाली पथक देखील तयार केले आहे.बुधववार दि.४ डिसेंबर रोजी सपोनि सोमनाथ शिंदे,पोकाॅ.पांडुरंग वाघ,पोकाॅ.अक्षय वाघ,पोकाॅ.भानुदास राठोड आदींचे पथक कार्यवाही करण्यासाठी तालुक्यात गस्तीवर होते.दरम्यान पथकास दोन दुचाकी स्वार गुटखा तस्करी करत असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस पथक हद्दीत सकाळपासूनच गस्तीवर होते.दरम्यान झिरोफाटा रोडवरील देगांव फाटा येथे दु.२ वाजण्याच्या सुमारास पुर्णे कडुन येणाऱ्या एच २२/बी.डी./३५४३ या दुचाकीला संशयावरून अडवले.यावेळी पोलीसांनी त्याची झडती घेतली असता त्यांचे जवळ १३ हजार ५०० रुपये किंमतीचे गोवा नामक गुटख्याचे ७५ पुडे आढळून आले .त्याला त्याचे नाव विचारले असता त्याने गोरखनाथ पुंडलिक लोंढे रा. आहेरवाडी ता. पुर्णा असे सांगितले त्यास त्याच्या दुचाकी सह ताब्यात घेऊन पोलीस पथकाने त्यास पोलिस ठाण्यात पाठवून पुन्हा हे पथक पथक पुढे कात्नेश्वर शिवारातील नांदगाव रोडवर दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास कार्यवाही करीता गेले दरम्यान या रस्त्यावर एम एच २२/ ए.झेड/४४८७ वरुन ट्रॅव्हल बॅग घेऊन जाणाऱ्या दुचाकीस्वाराला अडवले.त्याला त्याचे नाव विचारले असता त्याने ओंकार माणिक मोरे रा. आहेरवाडी ता. पुर्णा असे सांगितले. त्याचे जवळ असलेल्या निळ्या स्पोर्ट बॅग, काळी ट्रव्हल बॅगाची तपासणी केली असता बँग मध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गोवा गुटखा ५८ पुडे,विमल पान मसाला २२ पुडे, राजनिवास पानमसाला ५० पुडे, जर्दा ७७ पुडे असा एकूण २७ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. पोलीसांनी त्या ईसमासह त्याची दुचाकी व जप्त केलेला गुटखा ताब्यात घेऊन
पूर्णा पोलिस ठाण्यात पोकाॅ.पांडुरंग नारायण वाघ,पोकाॅ.भानुदास राठोड यांच्या फिर्यादीवरून ओंकार मोरे तसेच गोरखनाथ लोंढे दोन्ही रा.आहेरवाडी ता.पूर्णा यांच्या विरोधात विविध कलमाखाली वेगवेगळे दोन गुन्हे दाखल केले असून तपास उपविभागीय पो.अ.डाॅ.समाधान पाटील व पोलीस निरीक्षक गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.