हुंडाबळी;तरुण विवाहीतेने सासुरवासाला कंटाळूनच केली आत्महत्या

Spread the love

पूर्णेतील बरबडी घटनेचे गुढ उकलले ;आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पूर्णा(प्रतिनिधी)
तालुक्यातील बरबडी शिवारात विहिरीत आढळून आलेल्या राणी हनुमान शिंदे २२ वर्षीय तरुण विवाहीतेच्या मृत्यूच्या घटनेची उकल झाली आहे,तीने सासुरवासाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.याप्रकरणी मयत मुलीच्या पित्याच्या फिर्यादीवरून पूर्णा पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या ५ जणां विरुद्ध तीचा हुंड्या साठी,शारीरिक मानसिक त्रास देऊन तीला आत्महत्येस परावृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की,पूर्णा तालुक्यातील मौजे बरबडी येथे बुधवारी ४ रोजी सकाळी ७ वाजण्या च्या सुमारास एका २२ वर्षीय तरुण विवाहीतेचा मृतदेह गावाजवळील एका विहिरीत आढळून आला होता.सदर मयत ही गावांतील हनुमान श्रीरंग शिंदे याची पत्नी राणी हीचा असल्याचे उघडकीस आले होते.मयत राणी शिंदे हीने आत्महत्या केली का तीची कोणी हत्या केली याची चर्चा सुरू होती. दरम्यान तीच्या सास-याने मंगळवारी‌ रात्री पासुन मयत राणी घरात नाही.तसेच तिचे स्वेटर व स्कार्प त्यांचे शेतातील विहीरीवर दिसत असल्याचे तीच्या माहेरी चुलत्यास फोनवरून कळवले होते.आहे.दरम्यान घटनेची माहिती मिळताच मयताचे वडील व माहेरकडील मंडळी तातडीने बरबडी येथे पोहचली होती.दरम्यान तीच्या सासरी तीचा पती,सासु सासरा पसार झाले होते.
पोलीसांनी याप्रकरणी सखोल चौकशी केल्यावर पोलिसां समोर घटनाक्रम उघडकीस आला. मयत विवाहीता हीला मागील काही दिवसांपासून हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक त्रास दिला जात असल्याने तीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली अशी माहिती मयत विवाहीतेच्या वडील भाउराव कदम रा. निळा ता. जि. नांदेड यांनी पूर्णा पोलीसांना दिली. पोलीसांनी राणीच्या मृत्युस जबाबदार असलेल्या पती हनुमान शिंदे,सासरा श्रीरंग शिंदे,सासु जयश्री,आजत, सासरा- सासु ५ जणांविरोधात आत्महत्येस परावृत्त केले प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे

बहीणाबाईने मुलाच्या मदतीने घात केला..?

बहीण भावाचे मायेचं नाते वृद्धिंगत व्हावे लेकीचा संसार सोन्याचा व्हावा ही अपेक्षा ठेवून मयत राणी शिंदे हीच्या पित्याने आपल्या काळजाचा तुकडा लाडाची लेक सख्ख्या बहीणीच्या पदरात घातली.लग्नात सोन्या नाण्यासह ७ लाख हुंडा देऊन २ वर्षांपूर्वी थाटात लग्न लावून दिले.मात्र नियतीने वेगळाच रंग दाखवला.बहीण भावाच्या नात्यात कटुता यावी की काय लग्नात ठरलेल्या हुंड्यापैकी शिल्लक राहीलेल्या ५० हजारांसाठी राणीचा सासरी छळ होऊ लागला.भावाने बहीणीला पाहुणे बोलाऊन समाऊन सांगून राहीलेले पैसेही दिले.मात्र छळ काही थांबला नाही.बहीण, भाचा सासरच्या मंडळींनी सतत केलेल्या छळाला कंटाळून शेवटी लाडक्या लेकीने टोकाचं पाऊल उचलून विहिरीत उडी घेऊन आपलं जीवन संपवलं.लेक जिवानिशी गेली.दुसरीकडे बहीणीलाही माहेर पोरक झाले आहे.

कळवला,दया,याचना नाही आली कामी..!

मुलीचा हुंड्यासाठी शारीरिक मानसिक छळ होत असल्याचे समजताच पित्याने कठोर हृदयाच्या बहीणीकडे हुंड्याचे शिल्लक पैसे देण्यासाठी सवड मागीतली.काही दिवसांतच पत्नीचे दागिने मोडून,शेतावर पैसा उचलून हुंड्याचे पैसेही नेऊन दिले.माझ्या लेकीला त्रास देऊ नका तीला पोटच्या लेकी प्रमाणे जपा असा कळवला, दया,याचना भावाने बहीणीचा उंबरठा झिजवून केली.मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही.शेवटी जीवा भावाच्या माणसांनी पैश्यासाठी नाती गोती विसरून लाडकीचाच घात केला.हुंड्याच्या चार पैशासाठी माणुसकी हरवून बसलेली मंडळी सुनेला लेकी प्रमाणे वाढवण्याचे सोडून तीचा छळ करत तीचा बळी देण्या ईतपत मजल मारत आहेत. याअधुनिक युगात आजही काही जणं बुरसटलेले विचार सोडायला तयार नाहीत.हे या घटनेने सिद्ध होत आहे.

1

You cannot copy content of this page