पूर्णा;तरुण विवाहीता आत्महत्या प्रकरण;चौघांना न्यायालयीन कोठडी

Spread the love

तालुक्यातील बरबडी येथील घटना;एक फरार
पूर्णा/प्रतिनिधी

तालुक्यातील मौजे बरबडी येथे हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून एका २२ वर्षीय तरुण विवाहीतेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्या प्रकरणात पोलिसांनी गजाआड केलेल्या ४ जणांना पूर्णा न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
    पूर्णा तालुक्यातील बरबडी येथील राणी हनुमान शिंदे या २२ वर्षीय तरुण विवाहीतेने हुंड्यासाठी सासरच्या मंडळींनी दिलेल्या जाचास कंटाळून गावाजवळील एका विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी ४ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली होती.याप्रकरणी पूर्णा पोलिस ठाण्यात सदरील तरुणीच्या पित्याने दिलेल्या तक्रारीवरून सासरच्या पाच मंडळी विरोधात कौटुंबिक हिंसा, हुंडाबळी, आत्महत्येस प्रवृत्त केले प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.घटना उघडकीस येताच पुर्णा पोलिसांनी घटनेप्रकरणी तरुणीचा पती हनुमान शिंदे त्याचे वडील श्रीरंग शिंदे,त्याचे आजी-आजोबा या चार जणांना काही तासांतच जेरबंद केले होते.दरम्यान पोलिसांनी चौघांना गुरुवारी ५ रोजी मा.पूर्णा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती.शुक्रवारी न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

पूर्णा तालुक्यातील मौजे बरबडी येथील राणी हनुमान शिंदे आत्महत्या प्रकरणात तीच्या मृत्युस कारणीभूत ठरलेल्या पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यातील मयत राणीची सासु नामें जयश्री श्रीरंग शिंदे ही घटना घडल्या पासुन पसार आहे.तीला जेरबंद करण्यास अद्यापही पोलिसांना यश आलेले नाही.

You cannot copy content of this page