वंचितच्या ईव्हीएम हटाव स्वाक्षरी मोहीमेत ७ हजार जणांचा सहभाग

Spread the love

बाळासाहेब आंबेडकर यांच्या आवहानाला पूर्णा तालुक्यात जोरदार प्रतिसाद

पूर्णा(प्रतिनिधी)  वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी ईव्हीएम विरोधात आक्रमक पवित्रा घेत राज्यभरात  सर्वत्र स्वाक्षरी मोहीम हाती घेतली आहे. पूर्णा शहर व तालुका शाखेच्या वतीने सुरू असलेल्या स्वाक्षरी मोहीमेला मोठा प्रतिसाद मिळाला असुन जवळपास ७ हजार जागरूक नागरिकांनी या स्वाक्षरी मोहीमेत सहभाग नोंदविला आहे.
        पूर्णा तालुक्यात वंचितचे कार्यकर्ते पदाधिकारी गावोगावी जाऊन स्वाक्षरी मोहीम राबवत आहेत.पूर्णा येथे दि.९ डिसेंबर रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे स्वाक्षरी मोहिमेचा टप्पा पार पडला. सोमवार आठवडी बाजाराच्या दिवशी ही मोहिम राबविण्यात आली यावेळी हजारोंनागरिकांनी युवक महिलांनी सहभाग नोंदवला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनिल मगरे ,युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड, दादाराव पंडित, उत्तमभैय्या खंदारे ,राज नारायणकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या कार्यक्रमास रिपाई नेते प्रकाश कांबळे,बसपानेते देवराव खंदारे, , कॉ अशोक कांबळे ,शामराव जोगदंड, राहूल कचरे ,ॲड सिद्धांत गायकवाड, अमृत कऱ्हाळे, अजय काळे, राहूल भगत, कैलास खारे ,पवन गायकवाड यांच्या वंचित आघाडी च्या कार्यकर्त्यांनी स्वाक्षरी मोहिम राबविण्या साठी प्रयत्न केले.पुर्णा तालुक्यात सह शहरात जवळपास ७ हजार जागरूक नागरिकांनी स्वाक्षरी मोहीमेला प्रतिसाद दिला असून यापुढेही ही मोहीम १० हजारांचा टप्पा निश्चित पार करणार असल्याचे वंचितचे जिल्हाजिल्हाध्यक्ष सुनिल मगरे ,युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड, यांनी सांगितले आहे

You cannot copy content of this page