ग्राहक जागरण पंधरवडा साजरा करा;अ.भा.ग्राहक पंचायतचे निवेदन

Spread the love

पूर्णा प्रतिनिधी

तालुक्यासह शहरातील दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी १५ डिसेंबर २०२४ या दिवशी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक जागरण पंधरवाडा साजरा करण्यात यावा या निमित्ताने पूर्णा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले १५ डिसेंबर २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या दरम्यान ग्राहक जागरण पंधरवाडा ग्राहक दिन साजरा करण्यात यावा यासाठी कॉलेज शाळा वस्त्या उपवस्त्या ग्रामीण भागातील छोटी मोठी खेडेगाव अशा सर्व ठिकाणी ग्राहक जनजागरीचे कार्य करण्याच्या अनुषंगाने निवेदन करण्यात यावे यासाठी शहरातील व तालुक्यातील जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य तसेच ग्राहक चळवळीतील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पथनाट्य निबंध स्पर्धा महिला मंडळ विविध स्पर्धा शेतकरी मेळावे अशा उपक्रमाद्वारे व्यापक जनसंपर्क करून ग्राहक जनजागरणाचे कार्य करण्यासाठी संबंधित यंत्रणा सूचना देण्यात याव्यात ग्राहक संरक्षण कायदा अन्नसुरक्षेच्या विविध माहिती ग्राहकांना पुरवणे कुटुंबावर उपभोगवादाचा प्रभाव दिशाभूल करणारी जाहिरात सायबर फसवणूक गुन्हे आणि डिजिटल अटल याबद्दल ग्राहकांना माहिती देणे वैद्यमापनशास्त्र अन्न व औषध प्रशासन या संबंधित जनजागृती माहिती अभियान राबवण्यासाठी माननीय तहसीलदार पूर्णा गटविकास अधिकारी पंचायत समिती ग्रामीण रुग्णालय पोलीस निरीक्षक विद्युत अभियंता गटशिक्षण अधिकारी तालुका कृषी अधिकारी पूर्णा इत्यादींना निवेदन देण्यात आले या निवेदनावर पूर्णा तालुका अध्यक्ष जनार्दन आवरगंड महिला तालुका अध्यक्ष राधाताई दुधाटे पूर्णा शहराध्यक्ष सय्यद सलीम सुहागनकर महिला शहराध्यक्ष मधुरा गरड तालुका संघटक शिवाजी शिराळे शहर संघटक सुशील गायकवाड उपतालुका अध्यक्ष लक्ष्मण शिंदे उपशहर अध्यक्ष नारायण सोनटक्के अनंता ढोणे संजय पांचाळ मुंजा भोसले यदिंच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या होत्या

You cannot copy content of this page