चुडावा पोलीसांच्या हद्दीत कंठेश्वर,रुपला पांढरीत अवैध दारू सह रोख रक्कम व मोटारसायकल जप्त…दोघांवर गुन्हा..

Spread the love

चुडावा पोलीसांच्या हद्दीत कंठेश्वर,रुपला पांढरीत अवैध दारू सह रोख रक्कम व मोटारसायकल जप्त…दोघांवर गुन्हा..
पूर्णा/ प्रतिनिधी
लाॅकडाऊन असल्याने होळी,धुळवडीसाठी स्वतःच्या फायद्यासाठी चुडावा पोलिस ठाण्याचे हद्दीतील कंठेश्वर,रुपला पांढरी येथे अवैधरित्या विक्री करणाऱ्या देशी दारुच्या अड्डयांवर पोलीसांनी छापेमारी करीत ५० दारुच्या सिलबंद बाटल्या रोख चार हजार रुपये तसेच एक दुचाकी असा एकुण ३६ हजार सहाशे रुपायांचा मुद्देमाल जप्त करत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
चुडावा पोलीसांच्या माहीती नुसार,दि.२८ रोजी होळी निमीत्त बंदोबस्त तैनात असलेले पो उप.नि. प्रकाश पंडीत व अन्य कर्मचारी यांना मिळालेल्या माहितीवरून कंठेश्वर येथे सायं ५ वाजण्याच्या सुमारास चंद्रकांत गौतम झिंजाडे याच्या घरी छापा टाकला यावेळी पोलीसांना पाहुन झिंजाडे हा पसार झाला.यावेळी पोलीसांनी अवैधरित्या साठवून ठेवलेल्या १८२० रुपये किंमतीच्या देशी दारुच्या ३५ बाटल्या आढळून आल्या सदर मुद्देमाल जप्त करुन पोलीसांनी चंद्रकांत झिंजाडे याचे विरोधात गुन्हा दाखल केला आहे.तर धुळवड निमित्ताने दि.२९ रोजी स.साडे आठ वाजेच्या वेळी सपोनि शिवाजी देवकते हे आपल्या सहकाऱ्यांसह रुपला पांढरी गावात गस्तीसाठी गेले असता तेथे त्यांना गावातील एका पानटपरी जवळील रस्त्यावर एक दुचाकीस्वार आढळून आला. त्यास थांबवून त्याचे चौकशी केली असता तो दिगंबर जनार्धन गुंडाळे रा.रुपला पांढरी असे नाव सांगितले.त्याची तपासणी केली असता त्याचे जवळ अवैध रित्या ठेवलेल्या देशी दारुच्या१५ बाटल्या व दारु विक्री करुन मिळवलेले ४ हजार रुपये आढळून आले.त्यास देशी दारु रोख रक्कम व दुचाकी असा ३४ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन त्याचे विरोधात गुन्हा दाखल केला आहे.या गुन्ह्यांचा तपास प्रविण टाक व पंडित पवार हे करीत आहेत.

You cannot copy content of this page