पडसाद;पूर्णेत बाजारपेठ स्वयंस्फूर्तीने बंद;प्रकाश दादा कांबळे यांचं शांततेचं आवहान
परभणी;संविधान पुस्तीकेच्या प्रतिकृतीची विटंबना
पूर्णा/प्रतिनिधी
परभणी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्याच्या घटनेचे लोण संबंध जिल्ह्यासह पूर्णा शहरात धडकले.वृत्त धडकताच शहरातील बाजारपेठ व्यापा-यांनी स्वयंस्फूर्तीने बंद केली.मात्र बाजारपेठेत अचानक बंद कशी काय झाली.यामुळे सर्वत्र एकच गोंधळ उडाला रस्त्यावर लोक सैरावैरा पळत सुटले वेळीच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ समाधान पाटील, पोलिस निरीक्षक विलास गोबाडे यांनी शहरात पोलीस पथकांच्या मदतीने सर्वत्र शांततेत राहण्याचे आवाहन केले. दरम्यान येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात शहरातील अनुयायांयी जमा होऊन घटनेचा निषेध व्यक्त केला.परभणी येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ उद्या बुधवारी ११ रोजी सकाळी प्रशासनाला निवेदन देण्यात येणार आहे . सर्वांनी शांतता पाळावी असं आवाहन रिपाइंचे नेते प्रकाशदादा, कांबळे, यांनी केले आहे यावेळी उत्तमभैया खंदारे, दादाराव पंडित, सुनील मगरे,तुषार गायकवाड यांची उपस्थिती होती.प्रसंगी बोलताना प्रकाशदादा कांबळे म्हणाले की,एका विकृबुद्धीच्या माणसाने केलेली ही घटना निंदनीय आहे.या घटनेमागे कोण सुत्रधार आहे याचा शोध प्रशासनाने घेतला पाहिजे.घटना घडल्याचे समजताच पूर्णेतील व्यापा-यांनी स्वयंस्फूर्तीने व्यवहार बंद केले याबद्दल त्यांनी आभार मानले. घटनेच्या निषेधार्थ अनुयायांकडून उद्या बुधवारी सकाळी ११ वाजता प्रशासनाला निवेदन देण्यात येणार आहे.सर्व अनुयायांनी शांतता पाळावी असं आवाहन त्यांनी यावेळी केले.
संविधान स्तंभ विटंबना घटनेच्या निषेधार्थ बुधवारी ताडकळस बंद...
परभणी येथील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील संविधान स्तंभ विटंबना घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी संविधान प्रेमी व आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून बुधवार 11 डिसेंबर 2024 रोजी ताडकळस येथील बाजारपेठ बंदचे आवाहन करण्यात येत आहे. तरी सर्व व्यापारी बांधवांनी दुकाने बंद ठेवून सहकार्य करावे ही नम्र विनंती . तसेच सकाळी 11 वाजता ताडकळस सर्कलच्या वतीने पोलिस ठाण्यात निषेध निवेदन देण्यात येणार आहे.तरी सर्व संविधान प्रेमी नागरिकांनी व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन समाजबांधवांनी केले आहे.