शेतमजूर विवाहीत महीलेचा विनयभंग करत पतीला जीवे मारण्याची धमकी

Spread the love

पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी येथिल घटना;एका जणांविरुद्ध गुन्हा दाखल; विनयभंग करणारा जेरबंद

पूर्णा(प्रतिनिधी)
एका ३५ वर्षीय शेतमजूर विवाहीत महीलेचा गावांतील एका ईसमानेच वाईट हेतुने, बळजबरी करण्याच्या उद्देशाने विनयभंग करत तीच्या नव-याला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना पूर्णा तालुक्यातील मौजे आहेरवाडी येथे घडली आहे.याप्रकरणी पूर्णा पोलिस ठाण्यात पिडीत महीलेच्या फिर्यादीवरुन दि.११ डिसेंबर बुधवारी सायं भा.न्या.सं.४५०/२०२४ अन्वय कलम ७४,३५१(२), ३५१(३)प्रमाणे एका जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेप्रकरणी पोलीसांनी तातडीने सदरील ईसमास जेरबंद केले आहे.
पूर्णा तालुक्यातील मौजे आहेरवाडी येथे एक ३५ वर्षीय महीला आपल्या पती,सासु, मुलाबाळांसह राहते. दोघे पतीपत्नी शेतमजुरी करुन आपला संसार करतात.दि.१० डिसेंबर रोजी रात्री ती पिडीता आपल्या घरात कुटुंबासह झोपली होती.मध्यरात्री दिड वाजण्याच्या सुमारास ती लघुशंकेसाठी घराबाहेर बाथरुमला गेली होती.लघुशंका करुन ती बाथरुम बाहेर आली असता बाथरुम जवळगावांतील माधव गंगाधर दिपके हा बाथरूमच्या शेजारून पिडीतेच्या जवळ आला व त्याने वाईट हेतुने बळजबरी करण्याच्या हेतुने हाताला धरून आढत तु माझ्या सोबत चल त्यावेळी तीने हात सोड असे म्हणत विनयभंग केला.तसेच तुझा संसार होवू देत नाही तुला व तुझ्या नव-याला खतम करतो असे म्हणला व तीला ओढत होता.त्यावेळी पिडीतेने आरडा ओरडा करुन पतीला आवाज दिला.पती व सासु घराबाहेर येताच तो तिचा हात सोडुन पळुन गेला.सदरील घटना घडल्यानंतर पिडीतेने आपल्या पती सोबत पोलीस स्टेशनला येवुन घडलेली घटना पोलिसांना सांगितली याप्रकरणी माधव गंगाधर दिपके रा. आहेरवाडी ता. पुर्णा याचे विरोधात पूर्णा पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेप्रकरणी पूर्णा पोलिसांनी संबंधित ईसमास गुरुवारी १२ रोजी दुपारी ताब्यात घेऊन जेरबंद केले आहे.तपास जमादार आमेर चाऊस हे करत आहेत.

You cannot copy content of this page