‘मुख्यमंत्री(CM) साहेब’ मा.सरपंच संतोष देशमुख खुन प्रकरणाचा तपास (CID)सीआयडी कडे सोपवा
पूर्णा(Purna Marath)तालुक्यातील सकल मराठा बांधवांची मागणी;तहसीलदारां मार्फत पाठवले निवेदन
पूर्णा/प्रतिनिधी:
मुख्यमंत्री साहेब ज्या गुंडप्रवृत्तीच्या लोकांनी मा.सरपंच संतोष देशमुख यांचे दिवसाढवळ्या अपहरण करुन क्रूरपणे त्यांची हत्या केली.त्या खुन प्रकरणाचा तपास सीआडीकडे सोपवून खुन प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे पूर्णा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.शुक्रवारी या संदर्भात येथिल शिष्टमंडळाने ना.तहसीलदार प्रशांत थारकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे हे निवेदन सुपूर्द केले आहे.
बिड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे मा.सरपंच यांचे काही गुंडांनी अपहरण करून त्यांचा निर्घृण खून केला आहे.या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत.पूर्णा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीसह ईतर आरोपींना तात्काळ अटक करुन त्यांच्यावर खुनाचे गुन्हे दाखल करावेत.आरोपींना राजकीय वरदहस्त देणा-यांना सहआरोपी करावे,केजचे पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक यांचे निलंबन करुन त्यांना सहआरोपी करावे,सदर खुन प्रकरणाचा तपास केज पोलीसांकडे न ठेवता त्या प्रकरणाची सिआयडी मार्फत चौकशी करुन केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी.घटनेचे साक्षीदारांना पोलिस संरक्षण द्यावे,अशा मागणीचे निवेदन प्रशासनाचे नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.निवेदनावर पुंडलिक जोगदंड, ज्ञानोबा कदम, रमाकांत क-हाळे,संजय कदम,पवन बोबडे, गणेश बुचाले, विनायक बोकारे,करण क-हाळे, निवृत्ती नवघरे, विठ्ठल नवघरे, ज्ञानेश्वर नवघरे, ज्ञानेश्वर बोकारे, कैलाश मोरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.