परभणी;न्यायालयीन कोठडीतील तरुणाचा मृत्यू

Spread the love

जिल्हा कारागृहातील घटना;शहरात तणावाचे वातावरण; जागोजागी पोलीसांचा तगडा बंदोबस्त


Parbhani: जिल्हा कारागृहात परभणीत दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला एक तरुण दगावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असल्याची माहिती समोर आली आहे.या प्रकारामुळे परभणी शहरात पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.घटनेची गंभीर दखल घेत नांदेड परिक्षेत्राचे आयजी शाहजी उमाप पुन्हा परभणीत दाखल झाले आहेत.
         सोमनाथ सूर्यवंशी वय (३५)मृत तरुणाचे नाव असून,तो परभणी येथे घडलेल्या विटंबना प्रकरणा नंतर उसळलेल्या हिंसाचाराच्या घटनेत त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले होते.सदरील तरुणास न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावल्यानंतर त्यास जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले आहे.रविवारी १५ रोजी त्याचा मृत्यू झाल्याची वार्ता धडकली.त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.  सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत सध्या काहीही स्पष्ट नाही. मृत्यूचे नेमके कारणा जाणून घेण्यासाठी न्यायाधीशांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात येणार आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची तोडफोड झाल्यानंतर पुकारण्यात आलेल्या बंद आंदोलनाला काल हिंसक वळण लागले होते. आंदोलकांचा मोठा जमाव, दगडफेक, जाळपोळ, पोलिसांचा आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज, जमावबंदी, इंटरनेट सेवा बंद अशा ताणलेल्या घटनांनंतर 50 जणांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या एकाचा कारागृहातच मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.

You cannot copy content of this page