परभणी जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक थंडी पारा४.६ अंशावर.!
काळजी घ्या;जोरदार थंडीची लाट
परभणी(प्रतिनिधी)
जिल्ह्यात हुडहुडी भरवणा-या थंडीची जोरदार लाट आली आहे.मागील आठवड्यापासुन पाऱ्याची झपाट्याने घसरण सुरूच असल्याचे दिसून येत आहे. रविवारी १५ डिसेंबर रोजी पा-यात घसरण होऊन पारा ४.६ अंशांवर पोहोचला आहे.त्यामुळे वाढत्या थंडीने परभणीकर गारठल्याचे चित्र पहावयास मिळाले. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाने केले आहे.
परभणीचा पारा महाबळेश्वर पेक्षाही जास्त झपाट्याने घसरताना दिसत आहे.शनिवारी जिल्ह्यातील पारा ७.८ अंशांवर होता. मात्र रविवारी यात मोठी घसरण होऊन परभणीचे तापमान ४.६ अंशावर आले आहे.गेल्या दोन दिवसांपासून शहर परिसरासह जिल्ह्यात पहाटेच्या सुमारास हुडहुडी,धूक्याची चादर दररोज सकाळी पसरत आहे. त्यामुळे जनजीवनावर सुद्धा परिणाम झाला आहे. दोन दिवसांमध्ये तापमानात सातत्याने घट होत आहे. शनिवारी जिल्ह्यातील पारा ७.८ अंशांवर होता. मात्र रविवारी त्यात जवळपास ३ अंशांनी घसरून ४.६ अंशावर पोहोचला. त्यामुळे परभणीकरांना बोचऱ्या थंडीचा अनुभव मिळत आहे. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात हुडहुडी कायम आहे.मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील तापमानात चांगलीच वाढ झाली होती. त्यामुळे रब्बीतील पिकांना मोठा फटका बसला. मात्र सोमवारी जिल्ह्यातील पारा १४ अंशांवर होते. ते थेट रविवारी पारा १० अंशांनी घसरून ४.६ अंशांवर पोहोचला आहे. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे.नित्यनियमाणे मार्निगवाॅक घेणारे नागरिक या थंडीच्या कडाक्यातही आस्वाद घेताना दिसत आहेत.