पूर्णेत कडकडीत बंद;सोमनाथ सुर्यवंशी यांचं कारागृहातील मृत्यु प्रकरण

Spread the love

भिम अनुयायांचे राष्ट्रपतींना निवेदन; जबाबदारांवर मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी

पूर्णा: संविधान पुस्तीकेच्या प्रतिकृतीची विटंबना प्रकरणानंतर परभणी शहरात उसळलेल्या हिंसाचाराच्या घटनेतील सोमनाथ सुर्यवंशी या आंदोलकांचा
पोलिस कोठडीत मृत्यू झाल्याची वार्ता रविवारी १५ रोजी घडली.या नंतर संविधान प्रेमींनी पुर्णेत बंद पुकारण्यात आला.बंद दरम्यान सर्व शहर कडकडीत बंद होते. मोर्चेकऱ्यांनी बुद्ध विहारा पासून शहराच्या प्रमुख मार्गाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या पर्यंत भव्य असा मोर्चा काढण्यात आला.त्याचे सभेत रूपांतर झाले. रिपाई नेते प्रकाश कांबळे,भदंत पय्यावंश,गट नेते उत्तम खंदारे ,तुषार गायकवाड,रौफ कुरेशी,दादाराव पंडीत यांनी उपस्थित मोर्चे कऱ्याना मार्गदर्शन करून शांततेचे आवाहन केले.प्रसंगी पूर्णेचे तहसीलदार प्रशांत धारकर,पो. नि.विलास घोबाडे यांचे मार्फत राष्ट्रपतींना एक निवेदन पाठविण्यात आले.ज्यात शहीद सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पोलीसांना जबाबदार धरून त्यांच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल करण्यात यावा. व त्यांना कडक शासन करावे.ही प्रामुख्याने मागणी करण्यात आली.संविधानाची विटंबना करणाऱ्यांचा सोपान पवार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.या
प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत सोपान पवार याची स्थावर व जंगम मालमत्ता शासनाने जप्त करावी.अशीही मागणी
निवेदनाद्वारे करण्यात आली.राष्ट्रपतींना पाठविण्यात आलेल्या निवेदनावर ॲड.धममा जोंधळे,साहेबराव सोनवणे,श्रीकांत हिवाळे,रवि गायकवाड, ॲड.सिद्धांत गायकवाड,आनंद वायवल, दिलीप गायकवाड,चक्रवर्ती वाघमारे, ॲड. हिरानंद गायकवाड,मुकुंद पाटील,विनोद
गायकवाड,प्रवीण कंकुटे,अशोक वाघमारे,अमोल गायकवाड,दीपक थोरात,विजय जोंधळे,श्यामराव जोगदंड,गौतम काळे , विरेष कसबे,दीपक रणवीर,
या प्रमुख कार्यकर्त्यांसह शेकडो महिलांनीमोर्चात सहभाग नोंदविला.मोर्चा शांततेत संपन्न झाला.

You cannot copy content of this page