कार्यकर्त्यांनी अपयशाने खचून जाऊ नये कार्यकर्त्याच्या पाठीशी कायम राहणार

Spread the love

आभार मेळाव्यात विशाल कदम यांचे प्रतिपादन

पूर्णा(प्रतिनिधी)


विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले जिवापाड मेहनत घेतली चांगल्या कार्यकर्त्यांची मला साथ मिळाली निवडणुकीत यश अपयश मिळत असते कार्यकर्त्यांनी अपयशाने खचून जाऊ नये आगामी काळात मी कार्यकर्त्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहील असे आश्वासन शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विशाल कदम यांनी कार्यकर्त्यांना दिले.पूर्णा तालुक्यातील माखणी येथे दि.१६ रोजी आभार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विशाल कदम यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला
पूर्णा तालुक्यातील माखणी येथे गंगाखेड मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल भाऊ कदम यांनी माखणीमध्ये येऊन मंदिराच्या कामाचे भूमिपूजन केले व माखणी गावकऱ्यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभेला मला भरभरून असे मतदान केले त्याबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी माखणी गावामध्ये येऊन संवाद साधला या कार्यक्रमाला ताडकळसचे सरपंच गजानन आंबोरे उपसरपंच प्रतिनिधी संजय जलारे, ह.भ. प .गंगाधर महाराज तांबे, पत्रकार सुरेश मगरे, तुकाराम आळणे, उत्तम नाना अंभोरे आदीची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना विशाल कदम यांनी सांगितले की कुठलीही अडचण व कुठलीही काम पडले तर गावकऱ्यांनी संकोच न करता माझ्याकडे यावे व मला आवर्जून फोन करावा आपण सदैव नागरीकांच्या अडी अडचनी सोडविण्यासाठी तत्पर राहु असे मनोगत कदम त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील आवरगंड, शिवाजी आवरगंड, सचिन आवरगंड, विष्णु आवरंगड आदींनी पुढाकार घेतला. कार्यक्रमास मोठ्या संख्येने ग्रामस्थांची उपस्थिती होती. सेवटी आभार प्रदर्शन प्रगतीशील जनार्धन आवरगंड यांनी व्यक्त केले.

You cannot copy content of this page