अबब..पित्ताशयात निघाले ११० खडे..!
Parbhniपरभणी;आर.पी.हाॅस्पीटल येथे ५५ वर्षीय रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया
परभणी(प्रतिनिधी)
शहरातील पाथरी रोड वरील आर. पी. हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे अत्याधुनिक दुर्बिणद्वारे शस्त्रक्रीया करून रुग्णाच्या पित्ताशयातून तब्बल ११० खडे काढून रुग्णाला असहाय्य त्रासापासून सुटका झाली आहे. एका ५५ वर्षाचा रुग्ण असहाय्य पोट दुखीने त्रस्त होऊन आर पी हॉस्पिटल येथे दाखल झाले. हॉस्पिटलचे शल्य चिकित्सक डॉ.आमेर तडवी यांनी रुग्णाचे रक्त, लघवी व सोनोग्राफी या वैद्यकीय चाचण्या करून घेतल्या. या चाचण्याच्या अहवालानुसार रुग्णाच्या पित्ताशयात असंख्य खडे आढळून आले. डॉ. तडवी यांनी रुग्णाला व त्याच्या नातेवाईकांना सर्व समजावून सांगत शस्त्रक्रिया हाच एकमेव मार्ग असल्याचे सांगितले. त्या सर्वांच्या संमतीनुसार या रुग्णावर शल्यचिकित्सक डॉ. आमीर तडवी यांनी अत्याधुनिक दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून त्या रुग्णाच्या पित्ताशयातून तब्बल ११० खडे काढून रुग्णाची वेदनातून सुटका केली. सदर शस्त्रक्रियेसाठी भूलतज्ञ डॉ. वांगीकर, डॉ. श्रुती सहारे व सहकारी संध्या आळणे, किशोर नवले, पवन लोंढे, यांनी सहकार्य केले. पाच दिवसानंतर रुग्ण त्याच्या घरी समाधानाने परतला. याप्रसंगी रुग्णाने व त्याच्या नातेवाईकांनी डॉक्टराचे, सहायकाचे व इतर स्टाफ प्रती आभार व्यक्त केले. या बाबत आर. पी. हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे यांनी सांगितले की, डॉ. राहुल पाटील यांच्या सर्वोत्तम आरोग्यसेवा व रुग्णसेवा या ध्यासातून उभारलेले व अल्पावधीतच सर्वसामान्य जनतेच्या मनात स्थान निर्माण करणारे आर पी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर हे तळागाळातल्या गोर गरीब जनतेसाठी अत्यंत माफक दरात सर्वोत्तम उपचार सेवा उपलब्ध करून देण्यात सदैव तत्पर राहील अशी ग्वाही या प्रसंगी दिली.