राज्य स्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत येथिल पूर्णेच्या गौरी भोसले व स्नेहल शिंदेचे यश
पूर्णा; हिंगोली जिल्ह्यातील कळमदुरी तालुक्यातील पावनामारी येथे दत्तजयंती निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या राज्य स्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत येथिल विद्या प्रसारिणी सभा शाळेच्या गौरी भोसले व स्नेहल शिंदे या विद्यार्थ्यीनींनी क्रीडा मार्गदर्शक सज्जन जैस्वाल, प्रकाश रवंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली यश संपादित केले आहे.
पावनामारी ता.कळमदुरी जि.हिंगोली येथे सोमवारी १६ रोजी दत्तजयंती निमित्ताने भव्य राज्य स्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत पुर्णा येथिल विद्या प्रसारिणी सभेची शाळेचे खेळाडुंनी सहभाग नोंदविला होता. या मध्ये गौरी भोसले व स्नेहल शिंदे विद्यार्थ्यांनींनी क्रीडा शिक्षक सज्जन जैस्वाल प्रकाश रवंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्रदीपक कामगिरी बजावत विजयश्री खेचून आणली.आयोजकांनी या दोघींना रोख रकमेचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.विनय वाघमारे मुख्याध्यापक डी.एल.उमाटे, एस आर हिंगणे , तसेच परभणी जिल्हा असोशिएशन चे अध्यक्ष संतोष एकलारे उपाध्यक्ष सतिश टाकळकर,गोविंद गिराम, कैलास टेहरे सतिश बरकुंटे, संतोष बहोत सर व.सर्व शिक्षकवृन्द यांनी अभिनंदन केले