धक्कादायक;अंगणवाडी सेविकेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
पूर्णा तालुक्यात १५ दिवसांत आत्महत्येची दुसरी घटना; अकस्मात मृत्यूची नोंद..
पूर्णा(प्रतिनिधी)
तालुक्यातील बरबडी येथे एका २३ वर्षीय तरुण विवाहीतेने सासरच्या जाचाला कंटाळून विहरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच याघटनेला १५ दिवसांचा कालावधी लोटला न लोटताच पुन्हा एकदा बरबडी गाव हादरले आहे.सोमवारी १६ रोजी सायं ४ वाजेच्या सुमारास एका ४३ वर्षीय अंगणवाडी सेविकेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.सदरील महीलेलेने आत्महत्या कोणत्या कारणाने केली हे मात्र नक्की समजू शकले नाही.याप्रकरणी पूर्णा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वनिता रामराव शिंदे वय ४३ वर्ष रा.बरबडी ता. पूर्णा.जि.परभणी असं त्या मयत अंगणवाडी सेविकेचे नांव आहे.तीचा मुलगा अर्जुन रामराव शिंदे यांनी दिलेल्या खबरीनुसार सोमवारी १४ रोजी बरबडी शिवारातील शेतकरी बालाजी शिंदे यांची गट नंबर ११४ मध्ये सामाईक शेती आहे.याशेतात असलेल्या विहिरीत अंगणवाडी सेविका असलेल्या वनिता रामराव शिंदे यांनी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास उडी घेतली.सदरील घटना ही ग्रामस्थांच्या लक्षात येताच ग्रामस्थांनी तीला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु तो अयशस्वी ठरला.घटनेची माहीती मिळताच पूर्णा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विलास गोबाडे, फौजदार प्रकाश इंगोले,बिट जमादार आमेर चाऊस चापोशि शेंबेवाड आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पहाणी केली.मयत महीलेचे प्रेत विहरी बाहेर काढून प्रेताचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला.याप्रकरणी पूर्णा पोलिस ठाण्यात रात्री उशिरा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.तपास आमेर चाऊस हे करत आहेत.