Panjabrao Dakhपंजाबराव डख: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पुन्हा अवकाळी पाऊस पडणार !
पूर्णा/प्रतिनिधी
राज्यात लवकरच अवकाळी पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज परभणीचे प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख तसेच पुणे वेधशाळेने नुकताच जाहीर केला आहे. वेधशाळेने सांगितल्याप्रमाणे दोन दिवसांनी १९ तारखेपासून महाराष्ट्रात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणातील सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर तसेच कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरावर हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो,तर
पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार,२१ ते २६ डिसेंबर पासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार आहे.दरम्यान महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळेल असा अंदाज त्यांनी यावेळी दिला आहे.यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, पुसद, अमरावती, वर्धा, वाशिम, बुलढाणा, अकोला, परभणी, लातूर, धाराशिव, बीड, सोलापूर, सांगली, सातारा, कोकण किनारपट्टी, मुंबई, अहिल्यानगर, छत्रपती संभाजी नगर, वैजापूर, गंगापूर, शिर्डी,संगमनेर, दौंड, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.१९ तारखेपर्यंत महाराष्ट्रात कडाक्याची थंडी राहील मात्र त्यानंतर राज्यातील हवामान बिघडणार आहे. वीस तारखेला राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान पाहायला मिळू शकते आणि २१पासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होईल असे पंजाब रावांनी आपल्या या नवीन बुलेटिन मध्ये स्पष्ट केले आहे