ऊसाच्या ट्रॅक्टर-ट्राॅलीला चुडाकीस्वाराने ठोकले
पूर्णा-नांदेड राज्य रस्त्यावरील चुडावा येथिल घटना;एक वयोवृद्ध व्यक्ती जखमी
पूर्णा(प्रतिनिधी)
रस्त्यावर उभारलेल्या एका ऊसाच्या ट्रॅक्टर-ट्राॅलीला चुडाकीस्वाराने पाठीमागुन येत जोरदार ठोकर दिल्याची घटना मंगळवारी १७ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील चुडावा शिवारात घडली असून या घटनेत एक ६० वर्षीय वयोवृद्ध दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.त्याचेवर नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.
पूर्णा-नांदेड राज्य रस्त्यावर महामार्ग पोलिस यांच्या दुर्लीत कारभारमुळे मागील काही दिवसांपासून वाहतुकीचे नियम तोडून सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे.त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघाताची घटना घडत आहेत.अनेक जणांना मृत्युने देखील कवटाळले आहे तर अनेकांना अपंगत्व आले आहे.मंगळवारी १७ रोजी रात्री नांदेड कडे जाणा-या रोडवरील एका धाब्यानजीक (एम एच २९, सिबी ५६२०) ऊसाने भरलेल्या दोन ट्रॉलीचा ट्रॅक्टर ऐन रस्त्यावर उभारलेला होता.दरम्यान रात्री ८ ते ९ वाजेच्या सुमारास. यादरम्यान गौर येथील रहिवासी बाबूराव गंगाराम वत्ते आलेगावकर (वय ६०) हे नांदेडकडून मोटारसायकल (क्रमांक एम एच २२, सी ४२८५) वरून गौरकडे जात असताना ते अंधारात ऊसाने भरुन उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकले.
अपघात एवढा भिषण होता की,धडक बसताच यात त्यांची मोटारसायकल ट्रॉलीच्या मागील भागात अडकून बसली.अपघातात यांच्या छाती, डोक्यात जबर मार लागून ते गंभीर जख् झाले.ऊपस्थितांनी त्यांच्या मदतीला धावून त्यांना तात्काळ नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.जखमी वत्ते यांच्यावर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.