पूर्णेत आंबेडकरी अनुयायांनी गृहमंत्री अमित शहांचा पुतळा जाळला

Spread the love

वादग्रस्त वक्तव्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी;राज्यसभेतील वादग्रस्त वक्तव्य भोवले


पूर्णा(प्रतिनिधी)
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संविधानावरील चर्चेदरम्यान डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी राज्यसभेत केलेली एक टिप्पणी वादाच्या भोवऱ्यात अडकली असुन, येथिल शेकडो आंबेडकरी अनुयायांनी बुधवारी १८ डिसेंबर रोजी येथिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौकात तीव्र निदर्शने केली.यावेळी अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी करुन त्यांना पदावरून बडतर्फ करण्याची मागणी करत त्यांचा पुतळा जाळण्यात आला..
गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी सभागृहात वापरलेल्या अपशब्दाच्या निषेधार्थ संतप्त शेकडो आंबेडकरी कार्यकर्ते बुधवारी येथिल डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात जमले.यावेळी त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत अमित शहा यांच्या पुतळ्यास चपलाने मारण्यात आले. त्यानंतर पुतळा दहन करण्यात आला. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सायंकाळी अनेक संतप्त आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांना पदावरून बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली. याप्रसंगी रिपाई नेते प्रकाश कांबळे, गटनेते उत्तमभैया खंदारे, वंचितचे दादाराव पंडित, ॲड. हर्षवर्धन गायकवाड, नागेश एंगडे, मुकुंद पाटील, शेख खुद्दुस शेख बशीर, ॲड. धम्मा जोंधळे, त्र्यंबक कांबळे,बाबा पठाण, अखिल अहमद, अजय काळे, शाहीर गौतम कांबळे, गौतम काळे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page