समाजहित जोपासणारे पूर्णेचे भुमिपुत्र अँड.रवी गायकवाड

Spread the love

परभणी(प्रतिनिधी)
आपण ज्या समाजात जन्माला आलो, त्या समाजाचे आपणही काही देणं लागतो या उदात्त भावनेतून समाजासाठी अखंडीत पणे काम करण्याचा मानस ठेवून आजपर्यंत नामांतराचा लढा असो किंवा मुंबई येथील हत्याकांड असो की पूर्णा येथील जयंती प्रकरण असो या सर्व प्रकरणामध्ये व समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी समाजासाठी विनाशुल्क न्यायालयीन लढाईलढून न्याय मिळवून देण्याचे काम करणारे पूर्णाचें भूमीपुत्र अँड. रवी यशवंतराव गायकवाड यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी नुकत्याच परभणीत घडलेल्या प्रकरणामध्ये अटकेतील भीमसैनिकांची जामीनावर आज रोजी सुटका केली, समाजहित जोपासण्याचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा रवी गायकवाड पुढे नेत आहेत., हे समाजातील नव्यापीढी साठी खूप प्रेरणादायी आहे.
शेड्युल कास्ट फेडरेशनचे मा. आ.एम. डी. नेरलीकर आणि अँड. रवी यशवंतराव गायकवाड यांचे आजोबां उपासक गोपाळराव गायकवाड यांनी हैदराबाद येथे मा. आमदार अँड.माधवराव नेरलीकरांना सोबत घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत भेट घडून आणली मा.आ.माधवराव नेरलीकर साहेब हे गोपाळराव गायकवाड यांच्या घरी भीम नगर येथे किरायाने वास्तव्यास होते हा इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय आहे.डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा सहवास लाभलेले गायकवाड कुटुंबीयांचे घर म्हणजे सामाजिक न्याय, समता, आणि स्वाभिमान यांचे प्रतिक.गायकवाड घराण्यातील आजच्या पिढीतील सुपुत्र अँड. रवी गायकवाड यांनी या वारशाला पुढे नेताना त्यांच्या कार्यात डॉ. आंबेडकरांच्या तत्वांचा साक्षात्कार घडवत ठेवला आहे, हे खरोखरच कौतुकास्पद आहे.हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे आणि डॉ. आंबेडकरांच्या शिकवणींना पुढे नेण्याचे एक उज्ज्वल उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.अँड. गायकवाड यांनी समाजातील उपेक्षित घटकांना विनामूल्य न्यायालयीन मदत देत या निरपराध लोकांची सुटका करण्यासाठी घेतलेला पुढाकार निश्चितच कौतुकास्पद आहे. दलित आंदोलन कर्त्यांची न्यायालयीन लढाई लढणारे पूर्णाचें भूमिपुत्रअँड.रवी यशवंतराव गायकवाड यांच्या बद्दल पुर्णेकरांनाही सार्थ अभिमान वाटत आहे.जेव्हा कोर्टात अँड. रवी गायकवाड वकील पुकार होते तेव्हा समाजाला न्याय देणारा समाजाचा वकील म्हणून त्यांच्याकडे सर्व पाहत असतात.अँड. रवी गायकवाड यांच्या कडे पाहून जय भीम फिल्म मधला नायक खऱ्या आयुष्यात पाहवयास आढळतो…..

You cannot copy content of this page