खळबळजनक;४० वर्षीय अनोळखी ईसमाचा मृतदेह आढळला..
ताडकळस रस्त्यावरील खुजडा गावाजवळील घटना;पूर्णा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद
पूर्णा(प्रतिनिधी)
येथून जवळच असलेल्या पूर्णा-ताडकळस रस्त्यावरील खुजडा गावाजवळ एका ४० वर्षीय ईसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना गुरुवारी १९ रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून,याप्रकरणी पूर्णा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,खुजडा येथून जाणाऱ्या पूर्णा-ताडकळस रस्त्याच्या कडेला गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अंगात निळसर शर्ट ,काळापॅन्ट गो-या वर्णाचा एक ४० वर्षीय ईसम पडलेल्या अवस्थेत ग्रामस्थांना आढळून आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली.यावेळी बघ्यांची एकच गर्दी जमली होती.सदरील ईसम कोण आहे,कुठचा आहे,त्यास नेमकं काय झाले,तो कशामुळे रस्त्याच्या कडेला पडला असेल असे तर्कवितर्क लावले जात होते.काही जागरूक ग्रामस्थांनी सदरील ईसम हा जिवंत असेल या आशेने पूर्णा पोलिसांशी संपर्क साधून त्यास येथिल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यासाठी आरोग्य सेवेच्या रुग्णवाहिकेस प्राचारन करुन त्यातुन त्यास रुग्णालयात घेऊन गेले दरम्यान पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, फौजदार प्रकाश इंगोले,बिट जमादार रमेश मुजमुले,पोकाॅ.जनार्दन खनपटे यांनी घटनास्थळी धाव घेऊन सदरील ईसमाची पहाणी केली.डाॅक्टरांनी तो मयत झाला असल्याने जाहीर केले.त्याची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याची ओळख पटत नसल्याने शेवटी पोलिसांनी पंचा समक्ष त्याची उत्तरीय तपासणी करवून घेतली.यावेळी डाॅक्टरांनी त्यास कावीळ झाला असुन त्याचा थंडीत कुडकुडल्यामुळे मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.पोलीसांनी उत्तरीय तपासणी करुन त्याची ओळख पटत नसल्याने त्याचा मृतदेह शितगृहात ठेवण्यात आला आहे.याप्रकरणी शिवराज भालेराव यांनी दिलेल्या खबरीवरुन पूर्णा पोलिस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.तपास रमेश मुजमुले हे करत आहेत.