विभागीय आट्यापाट्या स्पर्धेत जय जवान जय किसान विद्यालयाचे दोन संघ विजयी
राज्य स्तरीय स्पर्धेसाठी निवड
पूर्णा (प्रतिनिधी): तालुक्यातील कावलगांव येथील जय जवान जय किसान विद्यालयाच्या १७ व १९ वर्ष वयोगटातील खेळाडुंच्या संघाने विभागीय आट्यापाट्या स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी बजावत आगामी काळात होणाऱ्या राज्य स्तरीय स्पर्धेसाठी आपल्या संघाची निवड सार्थ ठरवली आहे.या यशासाठी खेळाडूंना मार्गदर्शन करणा-या शिक्षकासह खेळाडुंचा विद्यालयाच्या वतीने गौरव करण्यात आला.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील बहिर्जी स्मारक विद्यालयाच्या मैदानावर नुकत्याच विभागीय आट्यापाट्या स्पर्धा पार पडल्या.या स्पर्धेतील विजेत्या संघाची राज्य स्तरावर होणा-या स्पर्धेसाठी निवड होणार असल्याने विभागातील अनेक शाळांतील संघ स्पर्धेत सहभागी झाले होते.पूर्णा तालुक्यातील जय जवान जय किसान विद्यालयाच्या १७ व १९ वर्षीय वयोगटातील खेळाडुंचे दोन संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. दोन्ही संघांच्या खेळाडुंनी उत्कृष्ट कामगिरी बजावत राज्य स्तरीय स्पर्धेसाठी आपल्या संघाची निवड सार्थ ठरवली आहे.
विजयी संघात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या १९ वर्षे गटांतील संघात बकाल ओमकार ,दुधमल हर्षद, गोडबोले वर्धविनायक कळसे विनायक ,बनसोडे, अजिस पठाण ,करण शिंदे आदिनाथ पांचाळ तर १७ वर्ष वयोगटातील पिसाळ कपिल, दुधमल पार्थ ,पिसाळ मारुती, पिसाळ गोपाळ, सावंत पठाण अरबाज ,पिसाळ तुकाराम, काशिनाथ पिसाळ, रुद्रेश पिसाळ,आदिनाथ पिसाळ,ऋतुराज ठोसरे ,श्रीराम किरगे, विनायक रोडगे, पार्थ पिसाळ, नागनाथ पिसाळ, रामेश्वर पिसाळ, अशी नावे आहेत.दोन्ही संघातील खेळाडू व त्यांच्या क्रीडा शिक्षकांचा शाळेच्या वतीने गौरव करण्यात आला.तसेच
पुणे या क्रीडा ठिकाणी राज्यस्तरावर झालेल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये शारदा मोहिते, गणेश कदम, गजानन कदम, सुरज कुंभारकर ,जीवन शेळके यांनी वेट लिफ्टिंग मध्ये चौथ्या क्रमांक पटकावला.तर नुकत्याच पार पडलेल्या “ऋतुरंग” राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजक सोमनाथ नागठाणे यांचा यावेळी सत्कार सन्मान करण्यात आला.