‘अटलदौड हाफ मॅरेथॉन’ स्पर्धेत पुर्णेचे धावपटू चमकले

Spread the love

१६ वर्ष वयोगटात माही कराळे, स्नेहल शिंदे, जानवी भाले विजयी; खेळाडूसह मार्गदर्शक सज्जन जैस्वाल यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव

पूर्णा (प्रतिनिधी) येथिल हौशी लंगडी असोसिएशनच्या खेळाडुंनी आपल्या यशाची घोडदौड कायम राखली असुन, पंतप्रधान अटल बिहारीजी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त अमरावतीत नुकत्याच पार पडलेल्या “राज्यस्तरीय अटल दौड हाफ मॅरेथॉन” या स्पर्धेत लौकीकाला साजेसा खेळ करत २१ किलो मीटरच्या या मॅरेथॉन स्पर्धेत स्पर्धेत क्रीडा मार्गदर्शक सज्जन जयस्वाल , प्रकाशराव रवंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली माही कराळे, स्नेहल शिंदे, जानवी भाले या धावपटूंनी नेत्र दीपक कामगिरी बजावत पूर्णेकरांची मान उंचावली आहे.
अमरावती येथील तुषार भारती मित्र परिवाराच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्य तेथील दसरा मैदानावर या “हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे” आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राज्याच्या विविध भागांतील जवळपास साडेतीन हजार धावपटू सहभागी झाल्याची नोंद आहे. परभणी जिल्ह्यातील हौशी लंगडी असोसिएशनच्या अनेक खेळाडुंनी देखील सहभाग नोंदवला होता. १६ वर्षीय वयोगटात पूर्णा येथील धावपटू माही जगन्नाथ कराळे हिने राज्यातून ७ वा तर स्नेहल शिंदे ८व्या आणी जानवी भाले हीने १० व्या क्रमांकावर मजल मारली आहे. या अटल दौड स्पर्धेसाठी येथील धावपटूंना क्रीडामार्गदर्शक सज्जन जयस्वाल यांचे सह क्रीडा शिक्षक प्रकाश खंदळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले विद्यार्थ्यांचे या घवघवीत यशाबद्दल येथील असोसिएशनचे अध्यक्ष तथा पूर्ण चे माजी नगराध्यक्ष संतोष एकलारे, सतीश टाकळकर, कैलास ठेहरे, सतिश बरकुंटे, संतोष बहोत, गोविंद गिराम, यांच्यासह उद्या प्रसारणी शाळेचे अध्यक्ष डॉ. विनय वाघमारे मुख्याध्यापक देविदास उमाटे, शिवदर्शन हिंगणे आदींनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page