खळबजनक;पूर्णेत एकाच दिवशी आढळले अनोळखी व्यक्तींचे दोन मृतदेह

Spread the love

ओळख पटवण्याचे पोलीसांसमोर आवहान;पोलीसात घटनेच्या नोंदी

पूर्णा(प्रतिनिधी)
शहराच्या विविध भागात एकाच दिवशी दोन अनोळखी मृतदेह आढळून आल्याची घटना गुरुवारी २६ डिसेंबर रोजी घडल्याचे उघडकीस आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.दोन्ही घटनेतील मयतांची ओळख पटवण्याचे पोलीसांसमोर मोठं आवहान असणार आहे.घटनेप्रकरणी पोलीसांनी नोंद घेतली आहे.
      या बाबत सविस्तर माहिती अशी की, गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पूर्णा रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरील कॅन्टीनजवळ गोल चेहरा, निमगोरावर्ण, डोक्याचे काळे पांढरे केस, मजबूत बांधा असलेल्या एका अनोळखी ७५ वर्षीय महीलेचा मृतदेह आढळला आहे. स्थानकावरील प्रवाशांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.लोहमार्ग पोलिस ठाण्याचे पोहेकाॅ.मावळसकर,पोकाॅ.अविनाश डावरे, होमगार्ड प्रकाश वाघमारे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सदरील महीलेचा मृतदेह ताब्यात घेतला.मृतदेहाचे ईन्केस्ट पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केला आहे.पोलीसांनी सदरील वर्णनात्मक महीलेचे मृत्यू प्रकरणी पूर्णा लोहमार्ग पोलीस ठाण्यात नोंद करत तीचे स्केच जारी केले असून सदरील महीलेस कोणी ओळखत असल्यास संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
    महाविरनगर भागातील एका विहिरीत सायं  ५ वाजण्याच्या सुमारास एक मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याने दिसुन येताच विहिरीजवळ बघ्यांची एकच गर्दी जमली होती.दरम्यान जागरुक नागरिकांनी सदरील माहिती पूर्णा पोलीसांना कळवली.माहीती मिळताच पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, सपोनि. शिंदे, सपोउपनि.रमेश मुजमुले,सपोऊपनी अण्णा माने, पोकाॅ.पवन लांडगेवाड,शरद टाकरस,पोकाॅ.खनपटे, पोकाॅ.शेंबेवाड आदींनी घटनास्थळी धाव घेऊन.पहीणी करत मृतदेह विहिरीतुन बाहेर काढून पंचनामा केला.
२६ वर्षीय अनोळखी तरुण ज्याचे अंगावर लाल शर्ट,काळा जिन्स पॅन्ट तसेच कुजलेल्या अवस्थेतील दिसून आला.पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेऊन त्याचे ओळख पटवण्याचे काम सुरू केले आहे.मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला असून, घटनेप्रकरणी पूर्णा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून तपास पूर्णा पोलिस करत आहेत.वरील वर्णाचा इसमाची ओळख पटल्यास पूर्णा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पो.नि.गोबाडे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page