ना.मेघनाताई बोर्डीकरांच्या हस्ते ‘पूर्णांई दिनदर्शिकेचे’ विमोचन
पूर्णा(प्रतिनिधी)
भाजपा जिल्हा संयोजक विजय कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘पुर्णाई’दिनदर्शिकेचे विमोचन
राज्याच्या उर्जा राज्यमंत्री ना.श्रीमती मेघनाताई (साकोरे) बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले.
नुतन वर्षारंभी प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी भाजपाचे जिल्हा संयोजक विजय कराड यांच्या संकल्पनेतून ‘पूर्णाई’ दिनदर्शिकेच्या ५ हजार प्रती छापून तयार करण्यात आल्या आहेत. राज्यमंत्रीपदी निवड झालेल्या मेघनाताई बोर्डीकर कराड बंधुंनी नुकतीच भेट घेऊन त्यांच्या हस्ते ‘पुर्णाई दिनदर्शिकेचे’ विमोचन करण्यात आले.यावेळी मंत्री बोर्डीकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.प्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बळीराम कदम,प्रदेश सचिव विनय कराड,आकाश लोहट, गोवर्धन मस्के, कपिल कदम, ज्ञानेश्वर कदम, संदेश कापुरे, निलेश ताटे, शंकर जाधव आदींची प्रमुख उपस्थित होते.