हमीभाव सोयाबीन खरेदीची मुदत वाढवून द्यावीपूर्णा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन बापुराव घाटोळ यांची मागणी

Spread the love

पूर्णा/प्रतिनिधी
येथील तालुका खरेदी विक्री संघांतर्गत सुरू असलेल्या शासकीय हमीदराच्या सोयाबीन खरेदीवर मार्केटिंग फेडरेशनच्या काही जाचक अटीमुळे गंडांतर आले असून, सोयाबीन खरेदी बंद पडल्याने खरेदी विक्री संघाच्या वतीने  खरेदीची मुदत दोन महिने पुढे वाढवून देण्याची मागणी केली आहे.
  पूर्णा येथून जवळच असलेल्या पांगरा रोडवरील समर्थ कृषी बाजारात तालुका खरेदी विक्री संघांतर्गत  महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि. मुंबईच्या परवानगीने काही दिवसांपासून शासकीय हमीदरात सोयाबीन खरेदीचा शुभारंभ करण्यात आला होता. नोंदनिकृत शेतक-यांच्या सोयाबीनला प्रति क्विंटल ४,८९२ रुपयांचा हमीदर मिळत होता. परंतू नुकत्याच मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने  सोयाबीन खरेदीबाबत काही जाचक अटी घातल्या गेल्या आहेत त्यामुळे खरेदी बंद पडली आहे.तालुक्यातील हजारों शेतकरी अद्यापही आँनलाईन नोंदनी पासून वंचित आहेत.शासनाने बंद केलेली आँनलाईन नोंदनी सुरू केल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल त्यामुळे सोयाबीन खरेदीची साईट सुरू करावी अशी मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे.
   मार्केटिंग फेड्रेशन मुंबई कार्यालयातील अधिकारी पानसरे यांच्याकडे पूर्णा तालुका खरेदी विक्री संघ चेअरमन बापूराव घाटोळ यांनी शुक्रवारी (दि.२७) एक तक्रार दाखल करत सोयाबीन खरेदीची मुदत दोन महिने पुढे वाढवून द्यावी,ओटीपी अट रद्द करावी,खरेदीसाठी बारदाना वेळेत उपलब्ध करून द्यावा, गोदामात वाहन वेळेत उतरून घेतले जात नसल्याने सोयाबीनची ५ टक्के घट होत आहे. येणारी घट शासनाने भरून द्यावी अशा मागणीचे निवेदन दिले आहे.

You cannot copy content of this page