कर्जाच्या विवंचनेत शेतकऱ्यांची विष प्राशन करून आत्महत्या
पूर्णा तालुक्यातील फुलकळस येथिल घटना;ताडकळस पोलीसांत नोंद
फुलकळस(पूर्णा)
डोक्यावर वाढत असलेला कर्जाचा डोंगर,सततची नापिकी यामुळे अर्थिक विवंचनेत सापडलेल्या एका ३१ वर्षीय तरुण शेतकऱ्याने विषारी द्रव प्राशन केल्याची घटना पूर्णा तालुक्यातील फुलकळस येथे घडली आहे. सदर शेतकऱ्याला उपचारासाठी हैदराबाद येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र उपचारा दरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. नोंद
गजानन सखाराम धुळशेटे रा.फुलकळस ता.पूर्णा जिल्हा परभणी वय ३१ वर्ष, असे त्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. धुळशेटे हे शेतात काम करुन आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवत असत त्यातच बाजारात मालाचे पडलेले भाव , सततची नापिकी, बँकेचे कर्ज उचललेल्या कर्जाचा डोंगर वाढत शच चालाला असल्याने डोक्यावर झालेले कर्ज कसे फेडावे या विवंचनेत ते सापडले असल्याचे समजते. त्यातच त्यांनी विषारी द्रव प्राशन केले. त्यांना कर्ज कसे उपचारासाठी हैदराबाद या येथील खाजगी ३१ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मयताचे चुलत भाऊ विरभद्र धुळशेटे यांच्या खबरीवरुन ताडकळस पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पोलीस अंमलदार दिपक बेंडे तपास करत आहेत