अखेर पंचायत समितीतील पेन्शन घोटाळ्याला वाचा फुटली..
पूर्णेत तत्कालीन दोन बीडीओसह ९ जणांविरुद्ध गुन्हा; १ कोटी ८४ लाखाचा अपहर
पूर्णा/ प्रतिनिधी
पूर्ण पंचायत समिती कार्यालय अंतर्गत लेखा विभागात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे प्रकरण सप्टेंबर 2024 मध्ये उघडकीस आले होते. या प्रकरणी स्थानिक प्रसार माध्यमातून याबाबत अनेक माध्यमांनी वृत्तही प्रकाशित केले होते. दरम्यान संबंधित विभागाकडून याप्रकरणी चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात येईल अशी भूमिका घेण्यात आली होती.अखेर मंगळवार दिनांक ७ रोजी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मयूर आंदेलवाड यांनी याप्रकरणी पूर्णा पोलिस ठाण्यात १ कोटी ८४ लाख रुपयांचा अपहार झाल्या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून तत्कालीन येथील पंचायत समितीच्या दोन गटविकास अधिकाऱ्यांसह ९ जणांविरुद्ध अपहार प्रकरणी गुन्हा करण्यात आला आहे.
पूर्णा येथील पंचायत समिती कार्यालयात लेखा विभागातील कर्मचार्यांनी सन आॅगस्ट २०२१-मे२०२३ काळात सेवानिवृत्त कर्मचा-र्यांच्या पेन्शन योजना, भविष्य निर्वाह निधीत पंचायत समितीच्या लेखाविभागातील कर्मचा-यांनी बोगस कागदपत्रे तयार करून सदरील रक्कम ही एका एजन्सीच्या नावे बँकेत टाकून जवळपास कोट्यावधी रुपयांचा अपहार केल्याची तक्रार येथिल सामाजिक कार्यकर्ते राहुल गायकवाड यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडे केली होती.ही बाब काही दिवसांपूर्वीच लेखापरीक्षणानंतर उघडकीस देखील आली होती.यापयाप्रकरणी जिल्हा परिषदेच्या वतीने चौकशी करून शेवटी मंगळवारी ८ रोजी रात्री उशिरा पंचायत समितीचे गटविकासधिकारी मयुर आंदेलवाड यांच्या फिर्यादीनुसार एम.बी भिसे वरिष्ठ सहाय्यक, एस.के पाठक सहाय्यक लेखा अधिकारी, सुनिता वानखडे व जे व्ही मोडके तत्कालीन गट विकास अधिकारी, अरविंद नामदेव अहिरे,सोनाजी नामदेव भोसले, नागेश निळकंठ नावकीकर,जयश्री टेलरिंग,शेख अझहर शेख समद या सर्वांनी संगनमत करून एकूण १ कोटी ८३ लाख ७७ हजार ८४४ रुपयाचा शासकीय रकमेचा अपहार हा स्वतःचे फायदा करिता स्वतःचे पदाचा गैरवापर करून मूल्यवान रोखे बनवून बिलाचे बनावटी करण करून सदरची रक्कम ही शासकीय आहे हे माहीत असून सुद्धा शासनाची फसवणूक करून संगणमताने गैरवापर केला अशी फिर्याद दाखल केली आहे.या फिर्यादीवरुन पूर्णा पोलिस ठाण्यात दोन गटविकास अधिकाऱ्यांसह ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पो नि/विलास गोबाडे हे करत आहेत.