श्रीदाजी महाराजानी श्रीक्षेत्र टाकळीला सिद्धपीठ बनविले-पं.अतुल शास्त्री भगरे
‘ श्रीदाजीगुरुदर्शन ‘ चरित्रग्रंथाचे प्रकाशन.
पूर्णा(प्रतिनिधी)
श्री सद्गुरू दाजी महाराजांची वैदिक परंपरा आजही कायम आहे त्यांच्यामुळे श्रीक्षेत्र धनगर टाकळी हे सिध्दपीठ बनले.त्यांच्या आचार विचारांचे पालन व्हावे,अशी अपेक्षा पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी व्यक्त केली.
मंगळवारी ( दि.7 जानेवारी). ‘ श्रीदाजीगुरुदर्शन ‘ या चरित्र ग्रंथाच्या चौथ्या आवृत्त्तीचे प्रकाशन श्री भगरे गुरुजी यांच्या हस्ते झाले.यावेळी वेदमूर्ती उमेश महाराज टाकळीकर,वेदमूर्ती अवधूत महाराज,ह.भ.प.माधवराव आजेगावकर,नारायण महाराज टाकळीकर,डॉ.हरिभाऊ पाटील,रामकिशन रौंदळे ,सैनाजी माठे, ग्रंथ मुखोदगत सद्गुरू भक्त सौ.आशा कारेगावकर,कमलाकरशास्त्री जोशी इत्यादी व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ.पाटील यांनी चरित्र ग्रंथांची पार्श्वभूमी विशद केली.
भागवत कथेच्या ज्ञानयज्ञात दुसरे दिवशी पंडित अतुलशास्त्री भगरे चारही युगातील ध्रुव,शबरी माता,आचार्य भीष्म आणि मातृ पितृ भक्त पुंडलिक या भगवद् भक्तांची दिव्य,प्रेरक कथा उलगडून सांगितली. विशेषता युगे अठठावीस विटेवरी उभा पुंडलिक भक्त विठ्ठल लक्षणीय होय,कारण तो स्वतः च्या नव्हे तर जगाच्या कल्याणासाठी उभा आहे,अशी भूमिका मांडली.
पुढे बोलताना ते म्हणाले की,भारतीय संस्कृतीत शास्त्राची परंपरा आहे.कोणत्याही शास्त्राचा सार मानवी जीवनाचे कल्याण हेच आहे.सत्य व प्रेम ह्या दोन परमात्म्याच्या शाखा आहेत. ते अनादी काळापासून चालू असून ‘ सत्यमेव जयते ‘ हे तत्त्व त्यात आहे.हेच भारताचं बोधवाक्य राष्ट्राचा आधार होय.मानवी जीवनाची सार्थकता असल्याचे ते प्रतिक होय,असे गौरवोद्गार श्री भगरे गुरुजींनी काढले.दरम्यान,आज पंचायतन याग व श्रीकृष्ण तुळशी सहत्रार्चन सोहळाही संपन्न झाला.भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभत असल्याची माहिती,वेदमूर्ती अवधूत महाराज टाकळीकार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.उद्या दि.9 जानेवारी 2025 गुरुवार रोजी ह.भ.प.सौ रोहिणी परांजपे (पुणे) यांची कीर्तन सेवा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले .