राज्यस्तरीय लंगडी स्पर्धा;परभणी हौशी लंगडी असोसिएशनचा संघ उपविजेता
पुर्णा(प्रतिनिधी)
Parbhani;शिर्डी येथे पार पडलेल्या (state level langdi)राज्यस्तरीय लंगडी स्पर्धेत परभणी जिल्ह्याच्या १८ वर्ष वयोगटातील खेळाडू संघाने नेत्रदीपक कामगिरी बजावत लंगडी स्पर्धेवर वर्चस्व राखत उपविजेतेपद पटकावले आहे.
आहील्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे महाराष्ट्र राज्य हौशी लंगडी असोसिएशनच्या वतीने १४ व्या राज्यस्तरीय लंगडी स्पर्धा पार पडल्या.यामध्ये परभणी जिल्ह्यातून हौशी लंगडी असोसिएशनच्या खेळाडूंनी मार्गदर्शक सज्जन जैस्वाल व प्रकाश रवंदळे यांच्या नेतृत्वाखाली सहभाग नोंदविला होता.१८ वर्ष वयोगटातील मुलींच्या संघाने या राज्यस्तरीय स्पर्धेत परभणी जिल्ह्यातील खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले आहे.पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य लंगडी च्या स्पर्धेवर आपले वर्चस्व कायम ठेवले व राज्यातुन द्वितीय येण्याचा मान मिळविला २०१६ ते २०२५ पर्यंत नेहमी प्रथम किंवा द्वितीय येण्याचा मान कायम ठेवत पुन्हा एकदा स्पर्धेवर वर्चस्व निर्माण केले आहे . आपल्या परभणी जिल्हयाचे नाव लंगडी खेळाचे नाव सर्व महाराष्टात गाजविले यामध्ये कर्णधार वैशाली धुत,यशश्री वाघ, गौरी भोसले, .साधवी मोधळ,स्नेहल शिंदे,शामल रोडगे, जान्हवी भाले .मिनाक्षी बानायत, वैशाली सुर्यवंशी,.गौरी डोणे,श्रेया डफुरे,.साक्षी वाघ,नंदिनी दवणे,.स्नेहा कापसे,. समृद्धी मोधळ, व नंदिनी पांचाळ या सर्व खेळाडुंनी शिर्डी येथील राज्यस्तरीय सपर्धेत आपल्या खेळाचा ठसा उमटवला अनेक संघाना पराभुत करून वर्धा संघ सोबत अतीतटीच्या लढतीत अवघ्या दोन गुणांनी पराभुत होऊन द्वितीय क्रमांक मिळवला.. या यशाबद्दल विद्या प्रसारणी शाळेचे संस्थाध्यक्ष डॉ.विनय वाघमारे भिमराव कदम सचिव श्रीनिवास काबरा विजय कुमार रुद्रवार उत्तमराव कदम साहेबराव कदम काकङे साहेब बी बी मोरे रनमाळ साहेब डॉ .हरिभाऊ पाटील मुख्याध्यापक डी एल उमाटे
लंगडी असोसिएशनचे अध्यक्ष संतोष एकलारे सचिव सज्जन जैस्वाल सुशील राव देशमुख गोविंद गिराम सतिश बरकुंटे प्रकाश बनाटे कैलास टेहरे दत्ता सुर्यवंशी यांनी अभिनंदन केले प्रशिक्षक म्हणुन क्रीडा शिक्षक माणिक कदम सर संघ व्यवस्थापक उद्धव बोबडे या खेळाडूंना मार्गदर्शन सज्जन जयस्वाल व प्रकाश रौंदळे यांनी केले