पेन्शन घोटाळा प्रकरण;लेखापाल, सहा.लेखापाल जेरबंद.

Spread the love

१ कोटी ८४ लाखांचा अपहार;पूर्णा पोलिस ठाण्यातील गुन्हा

पूर्णा(प्रतिनिधी),:
येथील पंचायत समिती कार्यालयांतर्गत असलेल्या लेखा विभागात सुमारे १ कोटी ८४ लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील दोन प्रमुख आरोपींना पूर्णा पोलीसांनी आठेचाळीस तासांच्या आत गजाआड करुन मा.पूर्णा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्या दोघांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पूर्णा पंचायत समिती कार्यालयांतर्गत १ अक्टोबर २०२१ ते मे २०२३ पर्यंत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन तसेच भविष्य निर्वाह निधी योजनेमध्य तत्कालीन दोन गटविकास अधिकारी तसेच लेखापाल व काही कर्मचारी आणि खासगी व्यक्ती अशा नऊ जणांनी पेन्शन धारकांच्या १ कोटी ८३ लाख ७७ हजार ८४४ हजार रुपयांवर डल्ला मारला आहे.सन २०२४ मध्य पंचायत समितीच्या जि प स्थानिक लेखा परिक्षणानंतर उघडकीस आले होते.याची कानकून काही जागरुक प्रसार माध्यांना लागताच तीन महिन्यांपूर्वी या बाबतचे वृत्तही प्रसिद्ध करण्यात आले होते.दरम्यान, सबंधित विभागाने दोषींवर चौकशी करून कारवाई करण्याचे सांगितले होते.अखेर तीन महिन्यानंतर सदर पूर्णा पंचायत समिती कार्यालयाअंतर्गत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन भविष्य निर्वाह निधी मध्य जवळपास दोन कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी विद्यमान गटविकास अधिकारी मयुरकुमार आंदेलवाड यांनी मंगळवार ता.७ जाने.रोजी पूर्णा पोलिस ठाण्यात पंचायत समिती मधील सहाय्यक लेखा अधिकारी एस के पाठक, वरिष्ठ सहाय्यक एम बी भिसे, तत्कालीन बिडीओ सौ एस के वानखेडे, तत्कालीन गटविअ जे व्ही मोडके, अरविंद नामदेव अहिरे, सोनाजी नामदेव भोसले, नागेश निळकंठ नावकीकर, जयश्री टेलरींग,शेख अहर शेख समद या नऊ जणांविरुद्ध विविध कलमाखाली गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या अठ्ठेचाळीस तासांच्या आत उपविपो डॉ समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोनि विलास गोबाडे यांनी व  त्यांचे सहकारी सपोनि सोमनाथ शिंदे,बंडू राठोड, अण्णा मानेबोईनवाड, मंगेश जुक्टे, श्याम काळे, अक्षय चौरे यांच्या पथकाने यातील लेखापाल एस के पाठक,एम बी भिसे यांना ताब्यात घेऊन गजाआड केले आहे.पोलीसांनी ९ जाने.गुरुवार रोजी सदरील प्रकरणातील ताब्यात घेतलेल्या दोघांना मा.विद्यमान न्यायालयांने त्यांना सोमवार दि१३ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

You cannot copy content of this page