श्रीजगद्गुरु शंकराचार्यांची श्रीक्षेत्र धनगर टाकळीत स्वागत

Spread the love

श्री सद्गुरू दाजी महाराज जन्मोत्सव व वैदिक गुरुकुलचा रौप्य महोत्सव कार्यक्रमास हजेरी
पूर्णा(प्रतिनिधी)
श्री सद्गुरू दाजी महाराज जन्मोत्सव व वैदिक गुरुकुलचा रौप्य महोत्सव कार्यक्रमास निमित्ताने आज दि.9 जानेवारी 2025 ,गुरुवार रोजी श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य हंपी विरूपाक्ष (हंपीपीठ), हम्पीपीठ यांचे श्रीक्षेत्र धनगर टाकळी येथे आगमन झाले. भारतीय संस्कृतीनुसार त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले .
श्रीक्षेत्र धनगर टाकळी येथे श्री सद्गुरू दाजी महाराज यांचा 165 वा जन्मोत्सव व सच्चीदानंद वेद स्वाध्याय प्रतिष्ठानचा रौप्य महोत्सव दि.2 ते 14 जानेवारी या कालावधीत संपन्न होत आहेत. पूर्वार्धात ऋग्वेद संहिता पद क्रम पाठ षडंगसहित पारायण पूर्ण झाले.उत्तरार्धात भागवतभूषण ज्योतिषाचार्य पंडित अतुल शास्त्री भगरे गुरुजी यांची दुपारी 3 ते 6 या वेळेत भागवत कथा ,सकाळच्या सत्रात 9 ते 12 या वेळेत श्री लक्ष्मी नारायण पंचायतन पंचकुंडी यज्ञ , विविध सहस्रार्चन, दैनंदिन रात्री 8 ते 10 या वेळेत कीर्तनकारांची नामसंकीर्तन सेवाही दि .7 ते 13 जानेवारी या काळात येथे असा अध्यात्मजागर चालू आहे.
दरम्यान,या सोहळ्यात आज गुरुवारी (दि.9 ) श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य हंपी विरूपाक्ष ,हंपीपीठ (कर्नाटक) यांची श्रद्धेय उपस्थिती लाभली.सवाद्य वैदिक मंत्राघोषात विधिवत पारंपरिक पद्धतीने जगद्गुरुचें स्वागत करण्यात आले.संस्थानाधिपती वेदमूर्ती उमेशमहाराज टाकळीकर, सौ.अपर्णामाई ,वेदमूर्ती अवधूतमहाराज,सौ.अश्विनी, प्रांजली या संयोजक कुटुंबीयांसह सद्गुरू भक्त यांनी पुष्पार्चन केले. भागवत कथा श्री जगद्गुरु यांनी श्रवण केली. विशेष
शुक्रवारी दि.10 जानेवारीला सोहळ्यात सकाळच्या सत्रात चंडीयाग विधी पूर्ण झाल्यानंतर संयोजकांच्या वतीने श्रीमद् जगद्गुरू यांची पाद्यपूजा करण्यात येणार आहे .यावेळी जगद्गुरु यांचे आशीर्वाचन होणार आहे. कुंकुमार्चन व महाआरतीनंतर श्री जगद्गुरु यांच्या दर्शनाचा लाभ भाविकांना मिळणार आहे,अशी माहिती वेदमूर्ती अवधूत महाराज टाकळीकर यांनी दिली.

You cannot copy content of this page