उड्डाणपूल बांधकामासाठीचा पर्यायी रस्ता बनला डोकेदुखी
वाहनधारकांना सोसावा लागतो मनस्ताप;महारेल कंपनीकडून दुर्लक्ष;नागरीक आंदोलनाच्या पवित्र्यात
पूर्णा(प्रतिनिधी)
शहरातील पुर्णा-नांदेड-अकोला या लोहमार्गावर मागील तीन वर्षापासून उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले आहे.सदरील कामांसाठी काढण्यात आलेल्या पर्यायी मार्ग नादरूस्त असल्याने येथून नांदेड ताडकळस,परभणी कडे ये-जा करणा-या वाहनधारकांना मोठी कसरत करण्याची वेळ आहे.संबंधीत विभागाने पर्यायी रस्त्याचे मजबुती करण करुन देण्याची मागणी वाहनधारकांकडून होत आहे.
पुर्णा येथे पूर्णा-अकोला, पूर्णा ते नांदेड लोहमार्गावर गत तिन वर्षापासून दमरेच्या महारेल कंपनीकडून उड्डाणपूलाचे बांधकाम तीन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेले आहे.सदरील बांधकामामुळे महारेल कंपनीकडून वाहनधारकांना पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्यात आला होता. काम पुर्ण होण्यासाठी आणखी काही महीन्यांचा कालावधी लागणार असल्याचे समजते. दरम्यान पर्यायी रस्ता जागोजागी खड्डेमय झाला आहे. रस्त्यावरील गीट्टी उखडून पडली असुन भले मोठाले खड्डे पडले आहेत.परिसरात बळीराजा सारखं कारखाना,पूर्णा साखर कारखाना, नृसिंह कारखाना,२१ शुगर आदीं कारखाने आहेत .सध्या ऊस तोडणी जोमाने सुरू असुन परिसरातील कारखान्यासाठी ऊस वाहतूक केली जात आहे.उडृडाणपुलाच्या कामासाठी तयार केलेल्या रस्त्यावरून कारखान्याच्या ऊसाची वाहतूक होते.या रस्त्यावर ऊस वाहतूक करताना ट्रॅक्टर चालकांच्या नाकी नऊ येत आहेत.जागोजागी रस्त्यावरील खड्ड्यात ऊसाची ट्रॅक्टर अडकून पडत आहेत.अडकलेल्या वाहनांना जेसीबीच्या साह्याने ओढून चांगल्या रस्त्याची वाट दाखवावी लागते आहे.तर सदरील रस्त्या परभणी, नांदेड ,ताडकळस कडे जाणारा रस्ता हा एकमेव रस्ता असल्याने येथुन अन्य वाहन धारकांना खराब रस्त्याचा त्रास होत असल्याने शहरातील वाहन धारकासह अन्य ठिकाणचे वाहन धारक शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर, फुलेनगर कडील गल्लीबोळातून वाट शोधून मार्ग काढत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
शिवाय रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट उठत आहेत.त्यामुळे अपघात तर वाढलेच आहेत मात्र परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.
महारेलने हा पर्यायी रस्ता तात्काळ दुरुस्त करून रहादारीसाठी खुला करुन देण्यासाठी टाळाटाळ केल्याचे दिसत आहे. यामुळे येथील उड्डाणपूल डोकेदुखी ठरत असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. सदर उड्डाणपूल कामाची स्थिती सुधारण्याकरिता दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागाचेही दुर्लक्ष दिसत आहे. याकडे रेल्वेच्या महाप्रबंधकाने लक्ष देवून ही समस्या कायमची सोडविण्याची मागणी शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांतून केली जात आहे.