दोन दुचाकींची समोरासमोर टक्कर;युवक जागीच ठार
पांगरा -पूर्णा रोडवरील घटना
पूर्णा(प्रतिनिधी), :
दोन दुचाकींची समोरासमोर टक्कर झाल्याची घटना पूर्णा तालूक्यातील पांगरा -पूर्णा रोडवरील तरंगल शिवारात रविवारी १२ जानेवारी रोजी घडल्याचे उघडकीस आले असून,घटनेत ३९ वर्षीय ईसमाचा डोक्यास जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
अर्जून दशरथ ढोणे (वय ३९) रा.पांगरा ढोणे या.पूर्णा असं अपघातात मृत्यू पावलेल्या ईसमाचे नांव आहे.या भिषण अपघाता विषयी अधिक माहिती असी की,पूर्णा तालूक्यातील पांगरा ते पूर्णा रोडवर ता.१२ जानेवारी रविवार रोजी पांगरा तर्फे लासीना येथील युवक शेतकरी अर्जून दशरथ ढोणे (वय ३९) हा आपल्या मोटारसायकल क्रमांक एम एच २२ एल ५३२५ वरुन गावाजवळील एका शेतकऱ्याचा ऊस तोडून मोळ्या बांधण्यासाठी शेतातील अखाड्यावर वास्तव्यास असलेल्या पत्नीला ऊस फडाकडे घेऊन येण्यासाठी पांगरा गावाकडून पूर्णा दिशेकडे अखाड्यावर जात होता.त्या दरम्यान तो पांगरा-पूर्णा रोडवर असलेल्या रमाकांत ढोणे यांच्या शेताजवळ येताच पूर्णेकडून पांगरा गावाच्या दिशेने पांगरा येथीलच कृष्णा गोविंद चव्हाण हा त्याच्या मोटारसायकल क्रमांक एम.एच/ २२ /ए वाय /६३६१ वरुन एम.एच /२२/ एल/ ५३२५ वरुन तीघे जणं जात असताना त्यांच्या मोटारसायकलने समोरुन येणा-या अर्जुनाच्या दुचाकीला जोरदार टक्कर दिली.या भिषण अपघातात गाडीवर स्वार असलेल्या अर्जून दशरथ ढोणे यांच्या डोक्याला व शररिराला जबरदस्त मार लागून तो गंभीर जखमी झाला.दरम्यान, समोरील दुचाकीवरील तीचे दुचाकीस्वार दारुच्या नशेत असल्याचे पहावयास मिळाले.तर त्यांच्या जवळ खिशात दारुच्या बाटल्या देखील उपस्थितांना आढळून आल्या.यावे नागरीकांनी सावधगिरी बाळगत त्यास तात्काळ नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.या दरम्यान अतिगंभीर प्रकृती असलेल्या अर्जून दशरथ ढोणे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.सदर घटनेची माहिती मिळताच चुडावा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी मुंडे,काकडे हे घटनास्थळी दाखल होवून त्यांनी पंचनामा केला.पुढील तपास सपोनि नरसिंग पोमनाळकर करत आहेत.अपघातात अर्जून ढोणे हे मृत्यू पावलेल्यामुळे पांगरा गावावर एकच शोककळा पसरली आहे.