पूर्णा पंचायत समीतीत पेन्शन घोटाळा..?

Spread the love

पूर्णा पंचायत समीतीत पेन्शन घोटाळा..?
दिड कोटींचा अपहार झाल्याची चर्चा; चौकशी होणार की,प्रकरणावर पडदा पडणार..!
पूर्णा/प्रतिनिधी
येथिल पंचायत समिती कार्यालयात लेखा विभागातील कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पेन्शनची खोटे बीले दाखवून दिड कोटी रुपयांचा अपहार केल्याची जोरदार चर्चा पूर्णा तालुक्यातील होत आहे. अपहार झाला आहे की नाही हे चौकशी अंती उघडकीस येणार असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी जिल्हा परिषदे‌कडुन केली जाते की या प्रकरणावर सोईस्कर रित्या पडदा टाकला जातो याकडे लक्ष लागले आहे.

   पूर्णा येथील पंचायत समिती कार्यालयात लेखा विभागातील कर्मचार्यांनी सन २०२२-२०२३ काळात सेवानिवृत्त कर्मचा-र्यांच्या भविष्य निर्वाह निधीत बोगस कागदपत्रे तयार करून सदरील रक्कम ही दुसर्याच्या नावे बँकेत टाकून जवळपास दीड कोटी रुपयाचा अपहार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.पूर्णा पंचायत समिती कार्यालयाचे काही दिवसापूर्वी आर्थिक लेखापरीक्षण करण्यात आले होते. लेखापरीक्षणाचा अवहालही तेच सांगतो असल्याचे पुढे येत आहे. या प्रकाराबाबत पूर्णा पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.कोट्यावधी रुपयांचा  घोटाळा पुर्णा पंचायत समिती कार्यालयात होत असताना स्थानिक गटविकास अधिकारी तसेच जिल्हा परिषदेच्या लेखा विभागातील वरिष्ठ अधिका-यांनी याप्रकाराकडे कानाडोळा केल्याने त्यांच्या ही कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. तर याप्रकरणी सखोल चौकशी व्हावी यासाठी राहुल गायकवाड यांनी याप्रकरणी आणखी मोठ्या प्रमाणात रक्कम वाढण्याची शक्यता असल्याचा आरोप करत या प्रकरणी सखोल चौकशी करावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.

———————–पूर्णा पंचायत समिती कार्यालयात लेखा विभागात कर्मचार्यांनी सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या पेन्शन मध्ये खोटे व बोगस बिल तयार करून दीड कोटी रुपयाचा अपहार केला असल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये लेखा विभागातील कर्मचाऱ्यांसह दोन ते तीन तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांचाही समावेश असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.प्रकरणाचे बिंग फुटल्यावरच नेमका कीती अपहार झाला यामध्ये किती जणांनी हात धुवून घेतले हे उघडकीस येणार आहे.त्यामुळे याप्रकरणी सखोल चौकशी करणे गरजेचे आहे.

You cannot copy content of this page