गोदाकाठी शेळ्या का चारतो म्हणून मेंढपाळास मारहाण

Spread the love

पूर्णा तालुक्यातील धानोरा मोत्या येथील घटना;चुडावा पोलीसांचा गुन्हा
पूर्णा/प्रतिनिधी
गोदाकाठच्या सार्वजनिक जागेत शेळ्या कसा काय का चारतो म्हणून एका 25 वर्षीय तरुण मेंढपाळास लाकडाने जबर मारहाण करून त्यास अर्वाच्य भाषेसह जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना गुरुवारी 16जानेवारी रोजी घडली आहे. याप्रकरणी मेंढपाळाच्या तक्रारीवरून चुडावा पोलीस ठाण्यात एका जणांविरुद्ध अॅट्रासिटी कायद्यासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पूर्णा तालुक्यातील धानोरा मोत्या येथील मनोज ज्ञानोबा दुधमल वय 25 वर्ष, यांनी विश्वनाथ गोविंद मोहिते यांच्या विरोधात चुडावा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार ते दुधमल हे गुरुवारी दि.16 रोजी दुपार पासूनच त्यांच्या कडे असलेल्या शेळ्या घेऊन गोदावरी नदीच्या काठावरील सार्वजनिक जागेत शेळ्या चरई करण्यासाठी घेऊन गेले होते.दरम्यान शेळ्या चारत असताना त्या ठिकाणी मोहीते आला.त्यानी तू नदीच्या काठावर सार्वजनिक ठिकाणी शेळ्या का चारता, येथे फक्त मी शेळ्या चारणार असे म्हणून अर्वाच्य भाषेत जातीवाचक शिवीगाळ करत मनोज दुधमल व त्याच्या सोबत असलेल्या एकास लाकडाने मारून जिवे मारण्याची धमकी दिली.अशी तक्रार दुधमल यांनी चुडावा पोलीस ठाण्यात दाखल केली.यातक्रारीवरुन चुडावा पोलीसांनी विश्वनाथ मोहीते यास तातडीने ताब्यात घेऊन त्याचे विरोधात गुरनं 10/2025 कलम115(2),352, 351 (3) भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये सह कलम 3(1)(R), 3(1)(S), 3(2)(Va) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी तपास उपविभागीय अधिकारी अधिकारी डॉ.समाधान पाटील हे करत आहेत.

You cannot copy content of this page