शाॅक लागुन मृत्यू पावलेल्या विशाल जोगदंडचे २० तासानंतर शवविच्छेदन

Spread the love

विजेचा धक्का लागून मयत झालेल्या आऊटसोर्सिंग कर्मचा-याचे मृत्यू प्रकरण;शोकाकुल वातावरणात गौर येथे अंतिमसंस्कार

पूर्णा(प्रतिनिधी)
येथील महावितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालया अंतर्गत आऊटसोर्सिंग कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या विशाल जोगदंड या
वय २२ वर्षीय तरुण कर्मचाऱ्यांचा  विद्यूत खांबावर काम करताना शॉक लागून रविवारी रोजी सायं मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
   साध्या हेल्पर पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह खांबावर कसे काय चढवले आणी काम करत असताना अचानक विजेचा धक्का कसा काय बसला,घटना घडल्यानंतर महावितरण कंपनीचा कोणीही कर्मचारी नसल्याने संतप्त झालेल्या विशालच्या नातेवाईक तसेच ग्रामस्थांनी घटनास्थळी दाखल होत आक्रमक पवित्रा घेत
मयत विशाल जोगदंड यांच्या  मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या तसेच खांबावर चढवणारे महावितरणचे कर्मचारी अधिकारी व अन्य दोषींवर कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी मृतदेह खांबावरुन खाली उतरवू न देता ठिय्या घालून आंदोलनाचे स्वरूप आले.पोलीस अधिकारी व गावातील काही जाणकारांच्या मध्यस्थीनंतर रात्री उशिरा विद्यूत खांबावरील तारेवर लटकलेला सदर मृतदेह खाली उतरवून घेण्यात येवून तो शासकीय रुग्णालयात दाखल केला. आक्रमक झालेल्या असंख्य चमूने मयाताचे पोस्टमार्टम होवू दिले नाही.त्यांनी आपली मागणी रेटून लावत अख्खी रात्रं जागून काढली.त्यानंणर ता २० जानेवारी सोमवार रोजी सकाळ झाल्यानंतर शुध्दा तोच विषय कायम ठेवण्यास सुरुवात केली.असंख्येने जमलेल्या ग्रामस्थांना समजावण्यात उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ समाधान पाटील,पोनि विलास गोबाडे यांची नाकीनऊ आल्याचे पहावयास मिळाले तर बाहेरुन सपोनि गजानन मोरे,सपोनि नरसिंग पोमनाळकर, पोउनि पडळकर यांनी ग्रामीण रुग्णालय, महावितरण कार्यालया समोर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता.पोलीसांची दंग नियंत्रण कुमकही बोलावण्यात आली होती. अखेर सामंजस्यातून जटील झालेला प्रश्न सोडवण्यात शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख विशाल कदम, नगरसेवक शाम कदम,अमृतराज कदम, गुट्टे मित्र मंडळाचे नितीन (बंटी) कदम साहेबराव कल्याणकर, गजानन हिवरे, जगदिश जोगदंड,लक्ष्मीकांत शिंदे, शंकर गलांडे,पूर्णा साखर कारखाना संचालक श्रिधर पारवे,शरद जोगदंड,नरेश जोगदंड सह अन्य प्रतिष्ठीत व्यक्तींच्या मध्यस्थीनंतर सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास म्हणजे तब्बल २० तासानंतर मयत विशाल जोगदंड यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले.मृत्युच्या एवढ्या तासानंतर शवविच्छेदन करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे उपस्थीतातून बोलले जात होते.त्यानंतर शोकाकुल वातावरणात गौर येथे मयत विशाल जोगदंड यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

You cannot copy content of this page